shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना व्हायरसने पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश दिला - प्रा.डॉ. ग्लेन मार्टीन

श्रीरामपूर : - कोविड-१९ ने संपूर्ण जगाला हादरून टाकले. जगभरातील रुग्णांना ऑक्सिजनची मोठया प्रमाणात उणीव जाणवली. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना जीव गमवावे लागले. त्याचे मुख्य कारण म्हणजे पर्यावरणाचा होत असलेला मोठया प्रमाणावरील ऱ्हास होय.  नैसर्गिक ऑक्सिजन मिळण्यासाठी वृक्षांची मोठया प्रमाणावर लागवड करणे, प्रदूषण टाळणे हे कामं प्रामुख्याने करावे लागतील व त्यासाठी डब्ल्यूसीपीए कटीबद्ध आहे.

असे प्रतिपादन वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ. ग्लेन मार्टीन यांनी व्यक्त केले. तसेच कोरोना व्हायरसने सर्वांना पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेशच दिला असेही त्यांनी आपल्या संबोधनात म्हंटले.
                        

पाच जून या " जागतिक पर्यावरण दिनानिमित '' आयोजित ऑनलाईन कॉन्फरन्स (वेबीनार) मध्ये प्रा.डॉ. मार्टीन बोलत होते. डब्ल्यूसीपीएच्या दिल्ली चॅप्टरद्वारे सदर वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते.

                         
या प्रसंगी मा.केंद्रीय मंत्री कालूलाल गुर्जर, डब्ल्यूसीपीएचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. नरसिंहा मुर्ती, पर्यावरण तज्ञ डॉ.मोहनलाल वर्मा, डॉ.संजीव कुमारी, ग्रीनमॅन विजय पालसिंग, पर्यावरणवादी उदीत नारायण भैंसला, योगाचार्या निशा मुकेश जोशी, मेजर सुशिल गोयल, देवनारायण, सत्यप्रकाश आर्या, राजीव जॉली खोसला आदींनी आपले पर्यावरण संवर्धनासाठी मनोगत व्यक्त केले.
                           
डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र (श्रीरामपूर) चॅप्टरचे अध्यक्ष तसेच नॅशनल मिडीया को -ऑर्डीनेटर डॉ. दत्ता विघावे यांनीही या प्रसंगी पर्यावरण संतुलनाविषयी आपले मत मांडले.
                            
डब्ल्यूसीपीएच्या दिल्ली चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. राकेश छोकर यांनी या वेबीनारचे अतिशय सुंदर आयोजन व सुत्रसंचन केले.
close