मुठेवाडगांव- शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणी अटक रमेश मुथा, गणेश मुथा, चंदन मुथा ,आणि आशा मुथा यांना मे. जिल्हा न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे.
सदर प्रकरणा मध्ये दोषारोप पत्र दाखल झाले असून तपास पूर्ण झाला असल्याने व रक्कम वसूली बाबत वेगळी कार्यवाही सुरु झाली आहे म्हणून सदर प्रकरणात मुथा यांना जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद मुथा यांच्या वकीलां तर्फे करण्यात आला. सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असल्याने त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करावा असा युक्तिवाद सरकार पक्षा तर्फे करण्यात आला.
दोन्ही पक्षाच्या युक्तिवादा नंतर मे. न्यायालयाने मुथा यांचा जामीन अर्ज मंजूर करुन त्यांना जामीनावर मुक्त केले आहे. आरोपींच्या वतीने ऍड. आर पी सेलोत, ऍड. मयूर गांधी आणि ऍड. पंकज म्हस्के यांनी काम पाहिले.

