shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनई पोलिसांची धडाकेबाज कारवाई. मोरेचिंचोरा हद्दीत दरोडाच्या तयारीत असलेले सहा चोरटे जेरबंद..!!

प्रतिनिधी । मोहन शेगर : 
न्यायालयाने सुनावली ५ दिवसांची पोलीस कोठडी

सोनई- पोलिसांना आज  सकाळी गुप्त बातमी द्ववारे माहिती मिळाली कि सोनई मोरेचिंचोरे रोडवर एमपी पासिंगची गाडी लावुन काही तरूण संशयितरित्या बसलेले आहेत.सोनईचे सहा.पोलिस निरिक्षक रामचंद्र कर्पे यांनी या माहिती आधारे पोलिस ताफ्यासह दुपारी मोरेचिंचोरा शिवारात भगवान इलग यांच्या घराजवळ छापा टाकला असता त्यांना सफारी ( एम.पी.4 -सी.जी.2007)या वाहनासह सहा जण संशयित चोरटे मोरया चिंचोरे शिवारात आढळले.

पोलिसांची चाऊल लागताच चोरटे शेतात पळुन जाण्यासाठी पळापळ करू लागले असता ग्रामरक्षक दलातील तरूणांच्या मदतीने  पोलिसांनी हे चोरटे पकडले.हे सर्व चोरटे मध्यप्रदेश राज्यातील शाजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.त्यांच्या कडून अंदाजे 36 हजार रूपये किमंतीचे 400 लिटर डिझेल हस्तगत करण्यात आले आहे.

तसेच कटावण,गज,कटर,दांडा,स्क्रुड्रायव्हर,दांडा इ.साहित्य व सफारी गाडी असा अंदाजे 5 लाख 56 हजारे मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला.आरोपीची नावे पुढील प्रमाणे धर्मेंद्र शिवणारायन सोळंकी,अजय दिनेश मालवीय,सलीम मोहमद खान,राकेश रामलाल सोळंकी, मिथुन शिवणारायन सोळंकी,अशोक रामचंद्र मालवीय असे पकडलेल्या सहा चोरटांची नावे आहेत.सर्व जण वीस पंचवीस वयोगटातील आहेत.हे तरूण महामार्ग रस्तावर डिझेल लुटीचे गुन्हे करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.अजुन पुढील तपास सोनई पोलिस करत आहेत. 

  या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे व शेवगावचे अप्पर पोलीस अधीक्षक मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो. निरिक्षक रामचंद्र कर्पे हे अधिक तपास करत आहे.मागील आठवडात सोनईत चोरटांनी दहशत बसवली होती यामुळे सोनई पोलिसांच्या या कारवाईचे परिसातुन कौतुक होत आहे. 

आजदिनांक १५ रोजी सदर घटनेतील सहा आरोपींना नेवासा न्यायालयात सहा.पो.नी ज्ञानेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली त्यामुळे अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
close