shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आसगाव कोविड सेंटरला भिम शक्ती तरुण मंडळ पुनाळ यांच्या कडुन मदत..!.


 पुनाळ/प्रतिनिधी :
आसगाव(ता.पन्हाळा) येथील कुंभी धामणी सामाजिक,आरोग्य, शैक्षणिक संस्था सुळे संचलित मोफत कोविड सेंटरला भिम शक्ती तरुण मंडळ संचलीत शिव-शाहू-फुले- आंबेडकर सार्वजनिक वाचनालय पुनाळ यांच्या कडून अंडी,पोहे,केळी असे पौष्टिक आहार युक्त साहित्य वाटप केले.डाॕ,आजित पाटील यांच्या मार्गदर्शना खाली कोविड सेंटर मधील रुग्णांची देखभाल  आत्यंत चांगल्या पद्धतीने सुरु आहे. 

साहित्य वाटप प्रसंगी मान्यवर


साहित्य वाटपा प्रसंगी कळे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिंदे,पोलीस हवलदार शंकर पाटील,पोलीस नाईक संदिप पाटील मंडळाचे अध्यक्ष तथा संघर्ष बहूजन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सात्ताप्पा पोवार,सामाजिक कार्यकर्ते निलेश चव्हाण,अरुण पोवार,कृष्णात पोवार,नाभिक समाजाचे ता.अध्यक्ष सदाशिव सुर्यवंशी,नाभिक महामंडळाचे जिल्हा सचीव सरदार झेंडे,मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश वडर, धीरज पोवार,दिपक पोवार,प्रकाश पोवार,अजित कारंडे आदि उपस्थित होते. 

close