shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मी जवळून पाहिलेले एक दिलदार व्यक्तीमत्.. संजय (मामा) शिंदे- बापूसाहेब बोराटे. अभिष्टचिंतन विशेष लेख

मी जवळून पाहिलेले एक दिलदार व्यक्तीमत्.. संजय (मामा) शिंदे- बापूसाहेब बोराटे. 
अभिष्टचिंतन विशेष लेख
 इंदापूर:१ जुलै १९८२ रोजी संजय शिंदे यांचा शेटफळ हवेली या छोट्याशा खेड्यामध्ये जन्म झाला. घरची अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. व त्यांच्या लहान वयातच त्यांचे वडील सर्जेराव शिंदे यांचे निधन झाले. कुटुंबातील प्रमुख गेल्याने कुटुंबावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. परंतु येवढ्या मोठ्या दुखाःतुन स्वतःला सावरत त्यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाई सर्जेराव शिंदे यांनी फार मोठ्या जिद्दीने घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी तयारी केली.    संजय शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटफळ हवेली येथे पार पडले. ते शाळेमध्ये जास्त नाही पण त्यातली - त्यात बर्‍यापैकी हुशार होते. त्यांना शिक्षणा ऐवजी क्रिडा क्षेत्रात जास्त आवड होती. 
          त्यांचे पुढील शिक्षण माध्यमिक विद्यालय शेटफळ हवेली येथे पार पडले. माध्यमिक जिवनात त्यांनी शिक्षणाबरोबरच क्रिडाक्षेञामध्ये फार मोठे नाव कमावले होते. दहावीमध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळाले. आता पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना कोणत्या तरी काॅलेज मध्ये एडमिशन घेण्याचे , घरची परिस्थिती हालाकिची असल्याने फार मोठे आवाहन होते. परंतु त्यांच्या मातोश्रीनी तडजोड करून   त्यांना इंदापूर येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. 
       येथूनच खरा संघर्षमय जिवनाचा प्रवास चालू झाला. 
                  काॅलेज जीवनामध्ये त्यांनी शिक्षणाऐवजी क्रिडा क्षेत्रात जास्त लक्ष देऊन उल्लेखनीय कामगिरी करत तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर आपले व काॅलेज चे नाव राज्य स्थरावर पोहोचवले. यासाठी त्यांना मा. .प्रा.  बाळासाहेब खटके सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आपल्या वक्तृत्व व कर्तृत्वावर भर देत राजकारणाबरोबर समाजकारणही जपण्यात यशस्वी झालेले युवा नेते संजय मामा शिंदे यांची ओळख ही एक कर्तृत्ववान नेता म्हणून झाली आहे. 
  शेटफळ हवेली मध्येच नव्हे तर,  पंचक्रोशीत त्यांच्या कर्तृत्वाचा बोलबाला झाल्याचे पंचक्रोशीतील नेत्यांनी मान्य केले आहे . निश्चितच अशा कर्तृत्व व सामाजिक दूरदृष्टी असणार्‍या नेत्यांच्या प्रयोगशील संकल्पनेतून शेटफळ हवेली गावाचा सार्वत्रिक विकासात्मक कायापालट होऊ शकतो,  याची खात्री आता तळागाळातील जनतेलाही पटली आहे. 
   स्वाभाविकच मग सार्वजनिक विकासाची आस लागलेल्या शेटफळ हवेलीला पुन्हा जुने, त्यांच्या हक्काचे चांगले दिवस परत आणण्यासाठी सामाजिक विडा उचलणाऱ्या . संजय (मामा) शिंदे यांचा आज ३९ वा वाढदिवस साजरा होत आहे त्यानिमित्ताने ........... 
        संजय शिंदे हे मुळातच दूरदृष्टी आणि विकासात्मक प्रयोगशील असं आगळं वेगळं व्यक्तीमत्व.  त्यामुळे जनसामान्यांसाठी संजय शिंदे हे स्वाभाविकच सर्वच पातळ्यांवर प्रभावी नेता म्हणूनच यशस्वी ठरले.  शेटफळ च्या नैसर्गिक, भौगोलिक व राजकीय गटातटाच्या परिस्थितीवर मात करत इथला सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी पावले उचलली आहेत. मुळातच संस्कारी, शारीरिक व मानसिकदृष्टय़ा समृद्ध असणाऱ्या नेत्यावर जी - जी राजकीय, सामाजिक जबाबदारी पडली, ती प्रत्येक जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. 
          हे करत असताना अगदी पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ते, कामगार असो किंवा मालक अथवा पुरुष असो किंवा महिला अगदी अबालवृध्दांचाही सन्मान करणारा नेता म्हणून त्यांची ओळख ही निश्चितच त्यांच्या जीवनातील यशाचे खरे टाॅनिक मानले जाते. 
    मुळातच जे सत्य आणि शक्य आहे, तेच बोलून नव्हे तर करून दाखविणारा नेता म्हणजे संजय (मामा) शिंदे त्यांना स्वकर्तृत्वावर खाञी असल्याने त्यांनी कधीही पोकळ घोषणा, भावनिक आवाहने, पूर्वजांच्या नावावर राजकारण करण्याचा अथवा सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. ज्याप्रमाणे त्यांच्या नावात जय आहे,  त्याच पध्दतीचा त्यांची राजकीय अथवा सामाजिक वाटचालही असल्याचे नेहमीच पहायला मिळते. त्यामुळे बोलबच्चन, पोपटपंची करण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करून आपल्या कामाचे प्रगतीपुस्तक घेऊन ते जनता जनार्दनाच्या दारात जातात. स्वाभाविकच त्यांनी यापूर्वी अशी कित्येक कामे करून मिळविलेला नावलौकिक जगजाहीर आहे.   
      संजय मामांनी आजपर्यंत कधीही आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला नाही. वाढदिवसानिमित्त त्यांनी रक्तदान शिबिर,वृक्षारोपण,जि. परिषद शाळेतील मुलांना मोफत गणवेश,पाठ्यपुस्तक वाटप,गरजूंना मदत करून साजरा केला आहे. 
         अशा या दिलदार व्यक्तीमत्व असणाऱ्या  संजय (मामा) शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*   !!!! 

 *शुभेच्छुक   :- बापूसाहेब बोराटे* 
                 *अध्यक्ष इंदापूर तालुका माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य ,* 
 *सरचिटणीस इंदापूर तालुका युवक काँग्रेस,*
close