जुन्या आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी घेतली बाबासाहेब पाटील यांची भेट
फोटो :- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लासुर्णे येथे ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.
इंदापूर:प्रतिनिधी दि.19/6/21
माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी लासुर्णे येथे जुन्या पिढीतील ज्येष्ठ मार्गदर्शक बाबासाहेब पाटील यांची शुक्रवारी (दि.18 ) सदिच्छा भेट घेतली. या भेटीत हर्षवर्धन पाटील यांनी बाबासाहेब पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी झालेल्या चर्चेत दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
बाबासाहेब पाटील यांचे वय आज 95 वर्षे आहे. या वयातही त्यांची तब्येत उत्तम आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊंच्या समवेत त्यांनी राजकारण, समाजकारण केले. नंतरच्या काळात हर्षवर्धन पाटील यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले. बाबासाहेबांनी इंदापूर पंचायत समितीचे अनेक वर्ष सभापती तसेच तालुक्यातील विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून प्रभावीपणे काम केले. या भेटीत हर्षवर्धन पाटील यांनी बाबासाहेबांना निरोगी असे दीर्घायुष्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी पाटील कुटुंबीय तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
______________________

