पुनाळ । प्रतिनिधी :
काटेभोगाव गृप ग्राम पंचायत मधील काटेभोगाव/पानारवाडी/तळेवाडी मधील सर्व ग्रामस्थांना कळवणेत येते की,सध्या पावसाळा सुरू झालेने सुरूवातीला कांही दिवस पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे तेव्हा सर्व नळकनेक्शनधारकांनी स्वतःचे नळाला काॅक तोटी जोडून घ्यावे याचबरोबर सर्वांनी पाणी गाळून उकळून प्यावे.पिण्याचे पाणी उंचावर झाकून सुरक्षित ठिकाणी ठेवावे.घरातील व बाहेरील उघड्यावरील शिळे अन्न पदार्थ खाणे टाळावे.अन्न पदार्थ गरम व ताजे खावावे व सुरक्षित झाकुन ठेवावे.तसेच आपापल्या घरावरील टायर, नारळाच्या करवंट्या,रिकामे डबे यांत पाणी साचुन डासाच्या आळ्यांची उत्पत्ती व डास होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
कोणत्याही प्रकारचे साथीच्या आजाराची लक्षणं जाणवलेस तात्काळ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जवळचे डाॅक्टर यांच्याशी संपर्क साधावा.अतिवृष्टी व पावसाने होणारी घराची पडझड लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी थांबावे..
याचबरोबर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असलेने विनाकारण घराबाहेर फिरणे,शहरी बाजार गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे,नियमित मास्कचा वापर करावा,वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावे,सॅनिटायजरचा वापर करावा,सोशल डिस्टींग पालन करावे.ग्रामपंचायत आवाहनानुसार सर्वांनी लसीकरण व कोरोना स्वॅब तपासणी करून घ्यावे..
घरातील वयोवृद्ध,लहान मुले,गरोदर माता भगिनी यांची विशेष काळजी घ्यावी.
सध्या आपण कोरोना महामारी संसर्ग प्रादुर्भाव साथ रोग व पावसाळा नैसर्गिक आपत्ती या दुहेरी प्रवासातून जात असुन प्रशासन व गृप ग्रामपंचायत काटेभोगाव कडून वेळोवेळी करण्यात येणारे सुचनांचे पालन करून सहकार्य करावे...आसे आवाहन काटेभोगाव गृप ग्रामपंचायतचे सरपंच रविंद्र पाटील यांनी केले आहे.

