प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि: २१/ मा,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 21 जून हा दिवस जगभरामध्ये जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने भाजपा करमाळा तालुका व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यावतीने करमाळा येथे शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी माननीय नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून भारतीय प्राचिन शास्त्र असलेल्या योगाची माहिती संपूर्ण जगाला पटवून दिली ,योगाचे महत्त्व समजून घेऊन प्रत्येकाने दैनंदिन जीवनामध्ये योगासने व व्यायाम केला पाहिजे असे आपल्या मनोगतात म्हटले ,
यावेळी योग प्रशिक्षक
श्री साहेबराव आरकिले सर ,आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री अभय शहाणे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
करमाळा भाजपा महिला आघाडीच्या वतीने ही योगदिन कार्यक्रम महिलांसाठी स्वतंत्र घेण्यात आला, यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन ,राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव ,माजी शहराध्यक्ष चंद्रकांत राखुंडे, माजी शहरउपाध्यक्ष मच्छिंद्र फंड ,भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा चिटणीस अश्विनी भालेराव, कल्पना भालेराव ,पद्मजा भालेराव ,पूजा रामनवमीवाले ,अस्मिता जवकर ,राधा येवले, राजश्री गवळी ,वैष्णवी काळे,
प्रसिद्धीप्रमुख जंयत काळे पाटील, प्रमोद फंड, गिरीष वाशिंबेकर,अक्षय कुंभार, मनोज मुसळे ,संताजी घोरपडे, शिवाजी कुंभार ,लक्ष्मण काळे ,प्रसाद कोकीळ ,विनोद इंदलकर ,महादेव गोसावी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

