shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काव्यांगण समूह नागपूर यांची राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा संपन्न..!


कोल्हापूर । प्रतिनिधी : नागपूर येथील काव्यांगण समूहचे मुख्य प्रशासक कमलेश सोनकुसळे यांच्या  वतीने आयोजित  राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या काव्य लेखन स्पर्धेत राज्य भरातुन नवोदित व जेष्ठ कवि कवयत्री यांनी खुप मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवुन काव्य लेखनीतुन समाज हिताचे,नव युवकांना चेतनामय ऊत्सावर्धक नव संदेश पर प्रबोधन्तमक मौलीक आशा रचनेतुन व्यक्त केल्या आहेत.

राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा २०२१ चा पुरस्कार वितरण सोहळा दि. २०.०६.२०२१ ला काव्यांगण व्हाट्सअप्प समुहात पार पडला. व्हाट्सअप्प समूहात नाविन्यपूर्ण रंगारंग सोहळा प्रथमतःच घेण्यात आला. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. 
        
दादासाहेब फाळके पुरस्कार २०२१ चा पुरस्कार प्राप्त 'स्वल्प विराम' या माहितीपटाचे निर्माते मारोती मुरके, नागपूर यांचे शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साहित्य अभ्यासक व कवी हणमंत गोरे सोलापूर, प्रमुख अतिथी म्हणून स्पर्धेच्या परीक्षक, जेष्ठ साहित्यिक सुधा उज्वल जाधव, कोल्हापूर, गझलकार व जेष्ठ साहित्यिक सुरेशचंद्र म्हात्रे, नवी मुंबई, जेष्ठ कवयित्री जयश्री अशोक बापट, पुणे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
          
स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, भावस्पर्शी, लक्षवेधी, उत्तेजनार्थ,  विशेष काव्य पुरस्कार अशा विविध गटांमध्ये रचनांचा गौरव करण्यात आला. नागपूर येथील कविवर्य ज्ञानेश्वर वांढरे (कोरोना गझल) यांच्या गझलेला सर्वोत्कृष्ट रचना म्हणून गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट रचना म्हणून गौरी वैभव चव्हाण, सातारा (जीवन-काव्य), शोभा वागळे, मुंबई (घन निळ्या श्रावणात), अनिल दाभाडे,रायगड(तू चांदणी), रेखा सोनारे, नागपूर (मधुसिंधु काव्य-संवेदना), अनिल शामराव केंगार, सोलापूर(अनाथ भिकारी), अनिल काळे, हिंगोली(गझल), परशुराम कांबळे, कोल्हापूर (मायबाप), छाया जावळे, सातारा (पाठलाग), प्रिती माधव जीवने(फुलु दे बाग जीवनाची), प्रदिप बोरकुटे यवतमाळ (शोधण्या सुखाला), शशिकला शेळके देशमुख, नाशिक (कुटुंब),  गितांजली योगेंद्र वाघ, पालघर (भुकेचा अर्थ कोणा कळे), डाॅ.अमरेंद्र कोंडावार, नागपूर (माझी आई), जान्हवी जोशी,सातारा(कुंद आज रे सारे), सुजाता सोनवणे, सिल्वासा (हवा मज आसरा) यांच्या रचनेचा गौरव करण्यात आला.लक्षवेदी माध्ये सुरेश वडर (पुनाळकर)कोल्हापूर व. अव्वल ठरलेल्या रचनांचे डिजिटल पोस्टर व सन्मानपत्र देऊन सर्व कवींना सन्मानित करण्यात आले.
          
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक काव्यांगण समुहाचे मुख्य प्रशासक कमलेश सोनकुसळे यांनी केले तर समुहाचे विश्वस्त हरेशकुमार खैरे यांनी समुहात मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.
close