नियमांचे उल्लंघन केल्यास व्यापाऱ्यांना तुरुंगात टाकायला आम्ही काय ड्रग्ज विकतो का: संतोष वर्मा...
प्रतिनिधी :संजय वायकर
अ .नगर :(दि .१७ ) : केंद्रसरकार च्या नवीन नियमानुसार दागिने ,सुवर्ण अलंकार आणि इतर उत्पादनावर हॉलमार्किंग बंधककारक केले गेले आहे .
यात फक्त १४ कॅरेट १८ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचे दागिने वस्तू विकण्याची परवानगी दिली असून या नियमांचे भंग केल्यास तुरुंगवास अथवा आर्थिक दंड करण्यात येणार आहे .
या संदर्भात अहमदनगरचे सराफ संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री .संतोष वर्मा यांनी सांगितले की या अटी जाचक आहेत . तसेच १९९३ साली हॉलमार्क भारतात कोठेही बंधनकारक करणार नसल्याचे लेखी सांगितले आहे . असे असतानाही हॉलमार्क नियमात आणणे योग्य नाही .
यासंदर्भात त्यांनी संबंधीत विभागाला या अगोदर निवेदनही दिल्याचे श्री . संतोष वर्मा यांनी सांगितले

