शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपूत्र संभाजी महाराज यांच्या जडणघडणीत सिंहांचा वाटा असणार्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा तारखेनुसार 17 जून पुण्यतिथी निमित्त वृक्ष वाटप करण्यात आले.
साधना सहकारी बँक मा.व्हाईट चेअरमन श्री.बाळासाहेब कोळपे यांच्या मार्गदर्शनांतर्गत महाराष्ट्र राज्य मध्ये वृक्षारोपण तसेच वृक्ष वाटप ग्रीन फाउंडेशन च्या माध्यमातून लोणी काळभोर कोळपे वस्ती येथील शेतकरी वर्गांना शंभरहून अधिक फळ झाडे वाटप करण्यात आली.
या मध्ये प्रामूख्याने आंबा,लिंबू ,काजू, चिकू, सीताफळ, जांभूळ,फणस अदि फळ झाडे वाटप करण्यात आली.यातून पर्यावरणाचा समतोल आबाधित राहणार असून,शेतकरी वर्गांस ह्या वृक्षांना फळे आल्यास त्यापासून रोजगार मिळणार आहे.या विचारांतून हा कार्यक्रम या दिवशी हाती घेण्यात आला.
वृक्ष म्हणजे जणू मानवांचे फुफ्फुस आज पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असतांना आज वृक्ष लागवड आपल्यांसाठी अतिषय महत्त्वाचा भाग झाला आहे.आपणांस शुद्ध हवा,सावली त्यांस समवेत.त्या पासून फळे अदि वस्तू आपणांस मिळत असतात.मात्र गेल्या काही वर्षात विविध कारणांमुळे वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात होत आहे.मात्र आपण मोकळ्या जागेवर वृक्ष लागवड आणी संवर्धन हा कार्यक्रम हाती घेतल्यास येणाऱ्या काही वर्षात निसर्गाचे सौंदर्य आपणांस जवळून पाहता येइल.
राजमाता जिजाऊ माँसाहेब स्मृतिदिनानिमित्त फळवृक्ष झाडाचे वाटप केल्यामुळे ह्या शेतकरीवर्ग झाडांना निच्छितच मोठे करुन त्या पासून त्यांस उत्पन्न मिळणार आहे या सर्व बाबीचा विचार करुन ग्रीन फाउंडेशन च्या माध्यमातून लोणी काळभोर येथिल कोळपे वस्ती येथे हा कार्यक्रमाचे प्रमुख वनविभाग अधिकारी श्री.सपकाळे साहेब, वनविभाग लोणी काळभोर अधिकारी जाग्रती सातारकर मॅडम तसेच या वेळी ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, दत्तात्रय शेंडगे, भाऊसाहेब कोळपे,सचिन कोळपे ,दादा कोळपे,जीवन जाधव, निरक बिका,भानुदास कोळपे,किरण बाचकर,राहुल कुंभार, अमित कुंभार, किरण भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.