shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोणावळ्यातील डाॅक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा; 67 लाखांचा ऐवज लंपास..!!

पुणे (लोणावळा):-लोणावळ्यातील प्रधानपार्क येथे डाॅक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर गुरुवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये 50 लाख रुपये रोख व दागिने असा साधारण 66 लाख 77 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळविला आहे.

गुरुवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा पडला. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लायडिंगची खिडकी खोलून सहा जण धारदार शस्त्रांसह घरात घुसले तर अन्य काही जण घराबाहेर थ‍ांबले होते.

डाॅक्टर खंडेलवाल यांच्या बेडरुमचा दरवाजा उघडा असल्याने दरोडेखोर थेट घरात घुसले. त्यांनी डाॅक्टर व त्यांच्या पत्नी यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावत हात पाय बांधत घरातील सर्व रोख रक्कम व सोनं असा ऐवज त्यांच्या समक्ष लुटला. साधारण अर्धा तासाहून अधिक काळ दरोडेखोर घरात होते. यानंतर गच्चीवरून चादर बांधत ते खाली उतरले व लंपास झाले.
close