श्रीरामपूर -शक्यतो साहित्यिकांची पुस्तके ही सोप्या भाषेत लिहिली पाहिजे, जेणे करून वाचकांना वाचण्यास सुलभ होईल. बोबडे सरांचे श्रीरामाचा संघर्ष हे पुस्तक अतिशय भावपूर्ण आहे.त्यामुळे हे पुस्तक वाचनीय असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले.
श्रीराम बोबडे सर लिखित 'संघर्ष श्रीरामाचा' या पुस्तकाचे प्रकाशन नगराध्यक्षा अनुराधताई आदिक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण निकम सर, पत्रकार प्रकाश कुलथे, स्नेहलता कुलथे, डॉ. शिवाजी काळे,आरोग्य मित्र सुभाष गायकवाड, देविदास चव्हाण, सौ. बोबडेताई,पोखरकर मॅडम,लेविन भोसले सर, पोखरकर सर, जानराव सर, पठाण भाऊसाहेब, कुलकर्णी सर,पत्रकार स्वामिराज कुलथे, औटी सर,चंद्रकांत धनवटे,भूषण साठे सर, आर्टिस्ट प्रमोद बोरा,महेश देशपांडे,बोबडे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
पुढे बोलताना आदिक म्हणाल्या, बोबडे सरांनी या पुस्तकाचे अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे, जीवनातील सर्वच प्रसंग मांडण्याचा प्रयत्न बोबडे सरांनी केला आहे. सगळ्यात महत्त्वाचे त्यांच्या आईचा शब्द त्यांनी पाळत स्त्रीचे समाजातील असणारे स्थान त्यांनी दाखवून दिले.
बोबडे सर जीवनपट उलगडताना म्हणाले,
संघर्ष कुणाल टळला नाही, त्यांचे प्रकार असतात, अनेकांचे त्यामुळे शिक्षण अपूर्ण
राहते.हे पुस्तक आई वडील यांना समर्पित करतो, वडील मोजणीदार होते. उपाशीपोटी आम्ही संघर्ष केला.आई वडिलांनी संयम,प्रामाणिकपणा शिकवला. यावेळी लक्ष्मण निकम ,पोखरकर सर ,यांनी मनोगत व्यक्त केले.
लेविन भोसले यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन पोखरकर मॅडम यांनी केले.
आभार सर्वज्ञ बोबडे यांनी व्यक्त केले.
येथील पत्रकार प्रकाश कुलथे व त्यांच्या पत्नी स्नेहलता कुलथे, यांनी स्नेहप्रकाश संस्थेमार्फत आत्तापर्यंत 80 पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. त्यामुळे पुण्या मुंबई येथील साहित्यिकांची मक्तेदारी मोडीत निघाली आहे. त्याच्यामुळे तळागाळातील सर्वसामान्य माणसाला लेखक होता आले. या सर्व कामासाठी त्यांचे चिरंजीव स्वामिराज डिझायनरची प्रमुख भूमिका बजावत आहे.

