shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस परिवारा कडून वाढदिवसाच्या राष्ट्रवादीमय हार्दिक शुभेच्छा..!!


थोडक्यात शिवभक्त किशोरभाऊ बळीराम बुंदगे यांचे मनोगत मनोगत.....!!

प्रतिनिधी ।  जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र, व्हाटसअप - ९७६८४२५७५७.

पुणे: अजितदादा अगदी पहाटे काम सुरू करतात. त्यांनी सुरू केलेले काम अगदी रात्री एक-दीड पर्यंत चालते. वर्षातील सर्व दिवस सलग व न थांबता, कंटाळता काम करणारा अन्य नेता सापडणार नाही. सध्या ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्याचवेळी कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या प्रशासनाचे मनोबल वाढविण्यासाठी सबंध महाराष्ट्र पालथा घताला आहे. अनेक जिल्ह्यात जाऊन त्यांनी आढावा बैठका घेतला.

तेथील कामकाज कसे चालते, त्यात काय सुधारणा हव्यात, कशी कार्यशैली असावी याबाबत ते अत्यंत जागरूकपणे दिशादर्शन करीत असल्याचे मी पाहिले आहे.  विकासकामांना कशी गती द्यावी याबाबत अनेक आमदारांना ते स्वतः सांगतात. एवढा बारीकसारीक तपशील त्यांच्याकडे असतो.

अजितदादांच्या कामाचा झपाटा, विकासाची दृष्टी पहायची असेल तर आजचे पुणे शहर व सभोवतालचा परिसर त्याची साक्ष देतो. सर्वांत वेगानं विस्तारलेलं नियोजनबद्ध विकसित शहर म्हणजे पिंपरी-चिंचवड म्हणता येईल. कोणतेही शहर व त्याच्या सुविधांचा विस्तार करताना त्यामागे कोणाचा तरी खंबीर पाठिंबा लागतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवारसाहेब यांनी त्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा त्यात सिंहाचा वाटा आहे. गेल्या पंचवीस वर्षांत राजकीय व प्रशासकीय ताकद देऊन या शहराचा चेहरामोहरा त्यांनी बदलला. हे शहर नावारुपाला आले. विविध उद्योगांनी येथे आपला विस्तार केला. त्यातून नव्या देशातील पिढीला हे शहर आकर्षित करू लागले आहे.

करोना काळात सर्वात जास्त कामाचा धडाका सोमवार ते गुरुवार मंत्रालयात, शुक्रवार पुणे जिल्हा, शनिवार बारामती, हा जनता दरबार घेऊन सर्वांची चर्चा करणारा नेता.....!!

दादा तुम्हाला सलाम आहे.

शिवभक्त किशोरभाऊ बळीराम बुंदगे, सोशल मीडिया अध्यक्ष - खडकवासला विधानसभा मतदार संघ - पुणे
close