shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करावे - शिर्डी ग्रामस्थांची मागणी..!!



शिर्डी शहर प्रतिनिधी :
आज शिर्डीतील ग्रामस्थांनी प्रांत यांना समक्ष भेटून अर्ज दिला की काल गुरुपौर्णिमा होती व सोबतच शनिवार रविवार आल्याने साईबाबा मंदिर बंद असतांना सुद्धा साईबाबांवर साईभक्तांची आस्था असल्याने शिर्डीत कळसाचे दर्शन घेण्यासाठी साईभक्तांची खूप गर्दी झालेली आहे. 


तशी गर्दी दर शनिवारी व रविवारी होत असते त्यातच शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असल्याने शिर्डीत आलेल्या साईभक्तांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत तेव्हा मेहेरबान साहेबांना विनंती आहे कि निदान साईभक्तांचे हाल होऊ नये म्हणून शनिवार व रविवार शिर्डी शहरात लॉकडाऊन शिथिल करून त्या ऐवजी दुसरे दोन दिवस लॉकडाऊन करण्यास आम्हा सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. आम्हास खात्री आहे कि आपण आमच्या मागणीस दाद द्याल ही अपेक्षा व्यक्त केल्या त्यावर प्रांत गोविंद शिंदे यांनी सांगितले की ग्रामस्थांच्या भावनेचा आदर करत लवकरच यावर विचार केला जाईल. त्यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, बाबासाहेब कोते, शिवसेनेचे कमलाकर कोते, सचिन कोते, नगरसेवक दत्तू कोते, राहुल गोंदकर, सुनील बारहाते, अनिल पवार, बाळासाहेब गायकवाड, नवनाथ विश्वासराव, मच्छिंद्र गायके, अमृत गायके, गिरीश सोनेजी आदि ग्रामस्थ उपस्थित होते ह्या आशयाचे जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, प्रांत शिर्डी यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.
close