shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई आश्रया व समता परिवाराच्या माध्यमातून निराधार महिलांसाठी सुरू झालेल्या प्रकल्पाचे उद्घाटन..!!

निराधारांना आधार देण्यासाठी समता कटीबद्ध - काका कोयटे..!!

शिर्डी शहर प्रतिनिधी : 
शिर्डी येथील साई आश्रया अनाथाश्रम व पतसंस्था चळवळीत अग्रभागी असलेल्या समता परिवाराच्या संयुक्त विद्यमाने नुकताच निराधार व गरजू महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी गृहउद्योग प्रकल्पाचे उद्घाटन प्रकल्पाचे मार्गदर्शक कोयटे, सुहासिनी कोयटे, सुनिता कोडे, शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, माजी विश्वस्त सचिन तांबे, नगरसेविका वंदना गोंदकर, ओमप्रकाश कोळपे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी कोयटे बोलत होते. 


ते म्हणाले, की कोरोना महामारी असो किंवा नैसर्गिक संकट, अशा वेळी शासन महिलांना आधार देण्यासाठी प्रयत्न करत असले, तरी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साई आश्रया व समता परिवाराच्या संयुक्त विद्यमाने या महिलांच्या जीवनात स्थिरता निर्माण करण्यासाठी विविध प्रकल्पांच्या माध्यमातून पाठबळ देऊन त्यांच्या मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे सांगितले.

कोते म्हणाले, की या महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रकल्पाच्या माध्यमातून मदत देण्यासाठी शिर्डी ग्रामस्थ म्हणूनदेखील आम्ही यासाठी पाठबळ उभे करून देऊ, असे ते म्हणाले. यावेळी अध्यक्ष गणेश दळव म्हणाले, की अनेकांच्या योगदानातून, पाठबळावर सुरू झालेल्या या कामात अनेकांचे सहकार्य राहिलेले आहे. त्यामुळे यापुढच्या काळातदेखील या निराधार महिलांसाठी सुरू केलेला प्रकल्प निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. निराधारांना आधार देण्यासाठी साई आश्रया अनाथाश्रम व समता पतसंस्था कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मार्गदर्शक ओमप्रकाश कोयटे यांनी केले.
close