नगर प्रतिनिधी:- (शिवा म्हस्के):
नगर तालुक्यातील टाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रताप वर प्रताप थांबतात थांबेना लोकप्रतिनिधी या मुजोर कामचुकार अधिकारी कर्मचारी पाठीशी घालत असल्याने या ठिकाणी घोळ मिटता मिटेना या आधी अनेक घोटाळे आपण अनेक दैनीकात वाचले असतीलच.परत पुन्हा एकदा हे प्राथमिक आरोग्य केंद्र चर्चे मध्ये आले आहे. उक्कडगाव गाव येथील रहिवासी तिपळे हे टाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी साठी गेल्या नंतर संबंधित कुटुंबीयांना कोरोना तपासणी कांडी आपल्या हातात दिला व स्वातांची टेस्ट स्वतःला करावी लावली या पुढे जात या कर्मचारीनी यांचे रिपोर्ट सुध्दा चुकवल्याचे प्राथमिक पाहणीत दिसत आहे.
जो व्यक्तीच आजारी आहे.त्या व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह तर ज्या व्यक्ती ठणठणीत आहे त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असा मेसेज संबंधित व्यक्तीच्या मोबाईल वर प्राप्त झाल्याने या कुटुंबातील सदस्य हैराण झाले आहेत.यात एका व्यक्ती वय १३० वय दाखवले आहे.तर ईतर ठणठणीत व्यक्तीना कोरोना पॉझिटिव्ह अहवाल पाठवला आहे.या व्यक्तीना पॉझिटिव्ह रिपोर्ट मेसेज द्वारे पाठवला आहे. मग हे कर्मचारी अधिकारी झोपेत काम करतात का... असा संतप्त सवाल नागरिक करत आहे.या निमित्ताने टाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी अधिकारी पुन्हा एकदा चर्चाते आले आहे.
या ठिकाणचा कारभार कधी सुधारणार प्रशासन व लोकप्रतिनिधी या अधिकारी कर्मचारी पुन्हा पाठीशी घालणार का हे आता पाहणे औचित्य ठरणार आहे.




