shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेची तयारी सुरू..!!



पॉझीटिव्हिटी रेट कमी करण्यात पालिकेला यश


विनया मेढेकर । पनवेल :-
कोविडची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी तज्ज्ञांनी कोविडची तिसरी लाट येण्याचे भाकित केले आहे. याच पार्श्वभूमीवर आज(27 जुलै)आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी वैद्यकिय आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली.


पहिल्या व दुसऱ्या लाटेतील ऑक्सीजन तुटवडा लक्षात घेता तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी , मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी यासंदर्भातील पॉवर पॉईंट प्रेझेटेंशन केले.ऑक्सीजन प्लॅन्टचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

तिसऱ्या लाटेमध्ये आवश्यक असणारे आयसीयू खाटा, ऑक्सीजन खाटा, साध्या खाटा, लहान मुलांच्या आयसीयू खाटा, ऑक्सीजन खाटा यांच्या नियोजनांवर चर्चा करण्यात आली.  या अनुषंगाने खासगी रूग्णालये, शासकीय रूग्णालये, पालिकेचे रूग्णालय तेथील सोयी सुविधा वाढविण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा, त्या दृष्टीने तातडीने कामास लागावे असे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.

तिसऱ्या लाटेमध्ये लागणारी महत्वाची औषधे पालिकेने खरेदी करून ठेवावी जेणे करून ऐनवेळी औषधांची कमतरता पडणार नाही. यासाठी प्रमुख विक्रेत्याबरोबर चर्चा करावी आणि महत्वाची औषधे खरेदी करावी अशा सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या.

तिसऱ्या लाटेत वॉर रुम अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ पालिकेने उभा करावे आणि वॉर रूम अधिक बळकट करावी असे आदेश वैद्यकिय आरोग्य विभागाला आयुक्तांनी दिले.

आत्तापर्यंत झालेले शासकिय व खाजगी लसीकरणाचा आढावा घेऊन, जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी उपाय योजनांवर भर द्यावा, लसीकरण रोज व्हावे यासाठी प्रयत्न करा अशा सूचना यावेळी आयुक्तांनी वैद्यकिय आरोग्य विभागास दिल्या.

यावेळी उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, बाबासाहेब चिमणे, वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा चांडक, डॉ. प्रियांका माळी, साद देशमुख, डॉ. भक्तराज भोईटे, डॉ. सुरेश पंडित, स्वप्नाली चौधरी, महाले, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
close