shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठा आरक्षणा संदर्भात विधिमंडळात भूमिका मांडा:-संभाजी ब्रिगेड..!!

आरक्षण प्रश्नावर मी मराठा समाज बांधवांसोबत* आमदार नमिता मुंदडा..!! 

_केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांना संभाजी ब्रिगेडचे निवेदन_
================
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :- मराठा आरक्षणा संदर्भात महाराष्ट्र राज्य विधिमंडळात भूमिका मांडा याबाबत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने शनिवार,दिनांक ३ जुलै रोजी निवेदन दिले


संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा ओबीसीकरणाचा लढा मागील तीस वर्षांपासून लढत आहे.त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर,कोषाध्यक्ष संतोष गाजरे,प्रदेश संघटक डॉ.बालाजी जाधव,प्रदेश संघटक  प्रा.सुदर्शन तारख,प्रदेश संघटक अतुल गायकवाड,केंद्रीय कार्यकारीणी सदस्य शशिकांत कन्हेरे,संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष ॲड.राहुल वायकर यांच्या आदेशानुसार शनिवार रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांना अंबाजोगाई येथे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,आपले पुढील मागण्यांकडे आम्ही लक्ष वेधून घेत आहोत.त्या मागण्या अशा १) मराठा समाजाचे ओबीसीकरण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करावे,२) मा.सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच्या मराठा समाजातील नौकरीस पात्र उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ द्याव्यात,३) मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तात्काळ माफ करावे,४) सर्व समाज घटकांची जातनिहाय जनगणना करावी.या सर्व मागण्यांसह मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावणे आवश्यक आहे.मा.सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला मराठा समाजातील नोकरीस पात्र २१८५ नियुक्त्या रखडलेल्या आहेत.हा तरूणांचा प्रश्न आहे.आपण एक युवा आमदार आहात.या विषयाकडे आपले लक्ष केंद्रित करून आपण तरूणांचे प्रश्न सोडविताल ही अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.याप्रसंगी युवा नेते अक्षय मुंदडा यांनीही आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी यापुढेही पुढाकार घेऊन पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली.निवेदन देताना जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे,जिल्हा प्रसिध्दीप्रमुख रणजित डांगे,ज्येष्ठ मार्गदर्शक नारायणराव मुळे,विभागीय उपाध्यक्ष विलास गुंठाळ,शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुहास माने,जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ काटे,राहुल खोडसे माझी तालुका अध्यक्ष केज,अंबाजोगाई तालुकाध्यक्ष संभाजी घोरपडे,केज तालुकाध्यक्ष कैलास चाळक,तालुका सचिव प्रा.राम ढोबळे,जिल्हा कोषाध्यक्ष रामराजे गलांडे,जिल्हा संघटक गजानन आंबाड,न्याय कक्ष प्रमुख ॲड.सुरज शिंदे,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अभिषेक भिसे,विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष केशव टेहरे,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब धुमाळ,अंगद गायकवाड,महावीर पटेकर,सुरज सोळंके,दत्तात्रय फपाळ आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

*मराठा आरक्षणा संदर्भात विधिमंडळ अधिवेशनात भूमिका मांडा :-राहुल खोडसे*
आ.नमिताताई,आपण केज विधानसभा मतदारसंघाच्या एक अभ्यासू लोकप्रतिनिधी आहात.संपूर्ण मराठा समाज आपल्याकडून मोठी अपेक्षा करीत आहे.त्यामुळे मराठा आरक्षणा संदर्भात महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात आमदार म्हणून आपण भूमिका मांडावी.मराठा आरक्षण प्रश्नावर यापूर्वी संभाजी ब्रिगेडने सातत्याने आंदोलने केली आहेत.


*आरक्षण प्रश्नावर मी मराठा समाज बांधवांसोबत :-*
केज विधानसभा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून आरक्षण प्रश्नावर मी मराठा समाज बांधवांसोबत आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भारतीय जनता पक्षाची व आमची ही भूमिका आहे.मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र विधान मंडळात आपण निश्चितपणे भूमिका मांडून यापुढेही पाठपुरावा करणार आहे.
*-आ.नमिता अक्षय मुंदडा (केज विधानसभा मतदार संघ.)*
close