कोरोना नियंत्रणात आणन्यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करित आहे मात्र नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील नागरिकांना आढावा बैठकीत केले अहवान .
इंदापूर प्रतिनिधी: कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही,थोडीश्या बेफिकीरची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल हे विसरू नका.कोरोना नियंत्रणात आणन्यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करित आहे मात्र नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ( दि.०३ जुलै) रोजी केले. इंदापूरात जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी विभागीय प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,तहसीलदार अनिल ठोंबरे,गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदणशिवे,कोवीड नियंत्रण अधिकारी डाॅ.प्रशांत महाजन,तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुनिल महाजन,डाॅ.नामदेव गार्डे,मुख्याधिकारी रामराजे कापरे,पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे,दिलीप पवार,पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस- पाटील,
पुणे जिल्हा नियोजन मंडळ समितीचे सदस्य सचिन सपकळ,तालुकाध्य हनुमंत कोकाटे,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,कार्याध्यक्ष अतुल झगडे,नवनाथ रुपनवर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे म्हणाले की इंदापूर तालुक्यात दि.२ जुलै रोजी ६१ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आला. असून एकूण २६६ व्यक्तींवर उपचार चालू आहे. यामध्ये ग्रामीण २३६ तर शहरी भागातील ३० नागरिकांचा समावेश आहे. म्यूकर मायकोसीसचे १६ रुग्ण तालुक्यात आढळून आले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून ११ रुग्ण बरे झाले आहेत.
तालुक्यातील परिस्थिती आजही गंभीर असून दहा पेक्षा जास्त रुग्ण असलेली निमगांवकेतकी,भिगवण,बिजवडी आणि खोरोची ही चार गावे हाॅटस्पाॅट आहेत. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे ही तालुक्यासाठी धोक्याची घंटा असून नागरिकांनी बेफिकीरपणे वागू नये.तालुक्यातील रुग्ण संख्या वाढू नये यासाठी पोलीस विभागाने कडक निर्बंध करावे वेळ प्रसंगी जनतेशी वाकडेपणा घ्या. पण ही परिस्थिती आटोक्यात आना असे आदेश राज्यमंत्री भरणे यांनी दिले आहेत.
तसेच ते पुढे म्हणाले की, लहान मुलांसाठी राखीव बेड ठेवले असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.आरोग्य विभागाने जागृत राहून तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या जास्तीत जास्त टेस्टींग करुन नियंत्रणात आणन्यासाठी प्रयत्न करावेत अशा सुचना दिल्या आहेत. शंभर च्या पुढे कामगार असलेल्या सर्व आस्थापना ठिकाणची आर.टी.पी.आर चाचणी करण्यात यावी. कोणतीही आस्थापना या चाचणीतून शिल्लक राहता कामा नये असेही आदेश भरणे यांनी दिले आहेत.

