सर्वांना जय बजरंग ...!!
कार्यक्रमानिमित्त तावशिगड ,तालुका लाहोरा, जिल्हा उस्मानाबाद या गावी गेलो होतो. तिथे गेलं तर समजा की गावचा कारभार म्हणजे ग्रामपंचायत ही गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष वडार समाजाच्या ताब्यात आहे,
किल्लारी भूकंपानंतर त्या गावाचं पुनर्वसन झालं तिथे 70 ते 75 टक्के लोक हे वडार समाजाचे आहेत. माजी तिथल्या सरपंचा बरोबर खूप उशीर चर्चा झाली. त्यांनी सांगितले की समाजाचे त्या गावात पूर्ण वर्चस्व गेले चाळीस ते पन्नास वर्षे आहे. मला ह्यातुन एक गोष्ट जाणवली ते सांगावसं वाटलं म्हणूनच कथन केले आहे.
भूकंप झाल्यानंतर पूर्ण घर पडली पण वडार समाजाच्या लोकांनी बांधलेले मंदिर अजूनही आहेत. दगडाचे बांधकाम हे वडार समाजाचे प्रतीक आहे, दगडी कोरीव सुंदर बांधकाम ..,भूकंप आलं तरी त्या मंदिराला काही झालं नाही. आज ते लुप्त होत चालले आहे, ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर हे पद वडार समाजाला खुप शोभून दिसायचे. ५० वर्षांपूर्वी वडार समाजाचे ठेकेदारी वर खूप वर्चस्व मानलं जात असे. पण बघता बघता बाकीचे समाजाने राजकारणाचा दबाव तंत्राचा वापर करीत वडार समाजाच्या रोजी रोटिवर व पोटावरती पाय दिला असं आताची परिस्थिती पाहता म्हणायला काही हरकत नाही.
जस दगडातून झाड उगवलं तसेच समाजाला नवीन ऊर्जा मिळेल का..?
त्यासाठी जरूर विचार करा..!
जय बजरंग, जय वडार..!!
स्वामी चौगुले
अक्कलकोट.

