shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्यापाऱ्यांनी सहकार्य केल्यास निश्चित कोरोनाची साखळी तुटेल- स.पो.नि.दिक्षा लोकडे..!!

हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख):

दि.३,हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरासह ठाणे हद्दीतील व्यापा-यांची सेनगाव पोलीस ठाण्यात कोरोना संबंधी घ्यावयाची काळजी संदर्भात बैठक बोलवण्यात आली होती  यात उपस्थित व्यापाऱ्यांनी कोरोना संबंधी योग्य ती काळजी घेतल्यास निश्चित कोरोनाची साखळी तुटल्या शिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे यांनी व्यक्त केला.


सेनगाव पोलीस ठाणे हद्दीतील सर्व व्यापाऱ्यांना कोरोना संबंधित घ्यावयाची योग्य ती काळजी यासंबंधी सेनगाव पोलीस स्टेशन व नगरपंचायत यांच्या संयुक्त प्रमाणे व्यापाऱ्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांची उपस्थिती होती या बैठकीत दरम्यान ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी केलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करण्याची अत्यंत गरज असून ते आपण पालन करावे त्यामुळे निश्चितच कोरोना साखळी तुटल्या शिवाय राहणार नाही असा ठाब विश्वास लोकडे यांनी व्यक्त केला.

शहरात व्यापारी आपल्या विविध प्रतिष्ठान अंतर्गत गिराईक सोबत व्यापार करत असतात या दरम्यान धोरणासंबंधी घ्यावयाची काळजी व जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी योग्य केल्यास सेनगाव ठाणे हद्दीत कोरोना संसर्गजन्य आजार नष्ट होण्यास फार वेळ लागणार नाही यासाठी सर्वांनी या महामारीत सतर्क राहून प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना केले आहे या बैठकीत उपस्थित ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिक्षा लोकडे बीट जमादार कराळे पोलीस कर्मचारी रमेश कोरडे, महादू शिंदे, चिंतारे, नरवाडे, वंजारी, अनिल भारती, बांगर, दीक्षा इंगोले, नगर पंचायत लिपिक विशाल जारे, सुनील देशमुख, बबन दिनकर इंजिनीयर पठाण यासह शहरातील व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सदर बैठकीदरम्यान कोरोना संबंधित घातलेल्या निर्बंधाचे काटेकोर पालन करून बैठक घेण्यात आली
close