shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मयताच्या कुटुंबाला वर्गमित्रांची मदत..!!

कोरोनाने माणसाला माणसात आणले..!! 

---- शरद झाडके, उपजिल्हाधिकारी

----------------------
 प्रकाश मुंडे  । बीड जिल्हा प्रतिनिधी :- 
कोरोनाने घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या निराधार कुटुंबाला त्यांच्या सर्व वर्गमित्रांनी मदत करून उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या हस्ते पंचेचाळीस हजार रु. चा मुदत ठेव योजनेचा बॉण्ड देण्यात आला. 

या बाबतची माहिती अशी की, साळेगाव येथील ऊसतोड मजूर असलेले वाल्मिक गालफाडे यांचे दि. ३१ मार्च रोजी कोरोनाने निधन झाले होते. त्या नंतर अवघ्या तीन दिवसा नंतर त्यांचे वडील नारायण गालफाडे यांचेही ३ एप्रिल रोजी निधन झाले. वाल्मिक गालफाडे यांच्या कुटुंबात जमीन नाही. त्यांच्या पश्चात विधवा पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांना उपजीविकेचे मजुरी शिवाय अन्य साधन नसल्याने त्यांचे वर्गमित्र लेखापरीक्षक बाबासाहेब गित्ते यांच्या पुढाकाराराने ४५ हजार रु. जमा केले.


दि. १४ जुलै रोजी उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या हस्ते आणि संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लालासाहेब बोराडे, जनविकासचे रमेश भिसे, तहसीलदार दुलाजी मेंडके, गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक दासाहेब सिद्धे, यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे, माजी उपसरपंच सय्यद नूर साहेब, नारायण लांडगे, सुभाष गालफाडे, रवींद्र जोगदंड, संभाजी सरवदे वाल्मिक गालफाडे यांच्या विधवा पत्नी श्रीमती सुनिता गालफाडे या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन पत्रकार गौतम बचुटे यांनी तर आभार राजकुमार गित्ते यांनी व्यक्त केले.


उपस्थितांनी केले वर्गमित्राचे कौतुक ! :-  वाल्मिक गालफाडे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणारे त्याचे वर्गमित्र प्रा.डॉ. संतोष गित्ते, बाबासाहेब गिते, सौ. क्षमा वैद्य-औटी, राजकुमार गिते, सौ.दैवशाला गोंद्रे-घाटुळे, सविता राजेश करपे, महादेव शिनगारे, बाळू सुखदेव बचुटे, भारत बचुटे, बलभीम बचुटे, नाना राऊत, उद्धव गायकवाड, धनराज सरवदे, सौ.अलका बेदरे-झाडबुके, राजकुमार पारखे, सौ.राजामती राऊत, बालासाहेब बचुटे, सुजवद्दीन शेख, महारुद्र पटणे, रमेश झाडबुके, नामदेव पोपळघट, अनिल अनंतराव इंगळे, बंडू पटणे, दादा गुजर त्यांचे वर्गशिक्षक रामराव राऊत आणि गदळे सर यांचे कौतुक व आभार व्यक्त केले.


चौकट :-

--------------------------------------------------


कार्यक्रमाला उपस्थित असलेले तहसीलदार दुलाजी मेंडके, बालासाहेब बोराडे व रमेश भिसे यांनी वाल्मिक गालफाडे त्यांच्या पत्नीला रोख १० हजार रु. ची मदत केली.


--------------------------------------------------


याला दानत म्हणावी ! :-  सविता करपे-राऊत यांनी वाल्मिक गालफाडे यांच्या कुटुंबासाठी किराणा सामान भरून दिले. विशेष म्हणजे मागील वर्षी सविता करपे-राऊत त्यांच्या पतीचेही निधन झाले असून त्यांनी ते दुःख बाजूला सारून मदत केली तर बंडू पटणे व दादा गुजर या शेतकरी मित्रांनी शेतातील ज्वारी या कुटुंबाला दिली.
close