राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी :-
रिक्षेत विसरलेली पासपोर्ट व्हेरिफिकेशन कागदपत्रे असलेली बॅग खारघर पोलिसांमुळे सुखरूप परत मिळाली.
रमेश वामन ढोरडे रा खारघर हे पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी खारघर पोलीस ठाणे येथे आले होते काम अटपल्यावर घरी जात असताना आपल्याला जवळील महत्वाचे दस्तऐवज असलेली बॅग रिक्षेत विसरले हा प्रकार लक्षात लक्षात आल्यानंतर परत खारघर पोलिसस्टेशन गाठून बॅग गहाळ झाल्याची माहिती दिली आणि आपली तक्रार नोंदवली सादर घटनेची माहिती बिट मार्शल १चे अंमलदार पोलीस शिपाई शेख व पोलीस शिपाई ढावरे यांनी सादर रिक्षाचालका चा शोध एका तासात घेऊन तपास काम पूर्णपणे करून झाल्यावर रिक्षा चालकाने रिक्षेत विसरून राहिलेली बॅग पोलिसांना सोपंविली
खारघर पोलीस स्टेशन मध्ये सदर बॅग रमेश वामन ढोरडे यांच्या ताब्यात देण्यात आली.

