shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पूरग्रस्तांच्या मदतीला निमगावकेतकीकरांचा उत्तम प्रतिसाद ..

पूरग्रस्तांच्या मदतीला निमगावकेतकीकरांचा उत्तम प्रतिसाद ..

कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान व इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने मदतीसाठी केले होते आवाहन.

ॲड. सचिन राऊत यांनी केले विशेष प्रयत्न.

इंदापूर: प्रतिनिधी (२५ जुलै २०२१) कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान व इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले होते त्यास इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील दानशूर  नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

 दोन-तीन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागात जोरदार पावसाने सुरवात केली असून सांगली,कोल्हापूर, चिपळूण,महाड या भागात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक नद्यांना पूर आल्याने तसेच अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्याने अनेक नागरिकांना बेघर व्हावे लागले आहे. अनेक गावे उदवस्त झाली आहेत. त्यांना यातून सावरण्यासाठी मदतीचा हात देऊन माणुसकी दाखवणे हाच माणुसकी धर्म आहे. आपल्या  अश्या आपत्कालीन परिस्थितीत   गरजवंतांना   मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य म्हणून  आज दिनांक २५ जुलै रोजी निमगाव केतकी येथील दानशूर नागरिकांनी ॲड. सचिन राऊत यांच्याकडे बेडशीट, टॉवेल , उबदार कपडे, जीवनावश्यक विविध वस्तू ,बिस्किट, फरसाना इत्यादी स्वरूपात लागणाऱ्या वस्तू निमगाव केतकी येथील नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी एकत्र करून मोठ्या स्वरूपात जमा केल्या आहेत . यावरून पूरग्रस्तांच्या मदतीला निमगाव केतकीकरांनी उत्तम असा प्रतिसाद देत  संकट काळामध्ये आपल्या बांधवांना मदत करून सामाजिक बांधिलकी जपली.
 
यावेळी ॲड .सचिन राऊत  माहिती देताना म्हटले की, संकट काळामध्ये पूरग्रस्तांना ज्या कोणाला मदत करायची असेल त्यांनी संपर्क साधून द्यावी. ती मदत पूरग्रस्तांना आम्ही पोहच करणार आहोत असे आव्हान त्यांनी  केले.
close