shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा वाढता प्रतिसाद..

इंदापूर तालुक्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा वाढता प्रतिसाद..

डाळज नंबर २ मधून दैवत फौंडेशन हिरालाल पानसरे मित्र परिवाराच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात..!!

इंदापूर प्रतिनिधी:(२६ जुलै २०२१) कोल्हापूर ,सांगली, कराड, पाटण, चिपळूण पूरग्रस्तांना एक हात मदतीचा या नात्याने कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इंदापूर तालुका यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डाळज नंबर २ येथील दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे इंदापूर तालुका अध्यक्ष हिरालाल पानसरे व मित्रपरिवार यांच्या वतीने (दि.२५ जुलै २०२१) रोजी बिस्किटांचे बॉक्स आणि पाण्याची बॉक्स देण्यात आले.

इंदापूर तालुक्यामध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दि.२४ जुलै रोजी आव्हान करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद म्हणून काल निमगाव केतकी कारांनी उत्तम असा प्रतिसाद दिला त्याच बरोबर डाळज नंबर २ येथील सामाजिक कार्यकर्ते दैवत फाऊंडेशनचे इंदापूर तालुका अध्यक्ष हिरालाल पानसरे त्यांचे मित्र परिवार रविराज हागारे, माऊली सोने, दत्ता वायसे, श्रीपाद निकम, पप्पू भोसले ,विपुल रुपनवर, प्रवीण डोईफोडे इत्यादींनी फूल नाही तर फुलाची पाकळी या तत्त्वाने २० बॉक्स कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांच्याकडे रात्री अकरा वाजता सुपूर्त केले.

 हिरालाल पानसरे हे  तरुण शेतकरी  असून या सामाजिक कार्यकर्त्याकडून अनेक प्रकारे कोरोना काळातही त्यांनी मदतीचा हात दिला आहे. तसेच वैद्यकीय सेवेमध्ये गरजू रुग्णांना विविध स्वरूपामध्ये मदतही ते करीत असून हे कार्य त्यांचे सामाजिक बांधिलकी या रूपाने ते आणि त्यांचे मित्र परिवार करीत असतात.

हिरालाल पानसरे माहिती देताना म्हणाले की, महाराष्ट्र सध्या अतिशय मोठ्या संकटांना तोंड देतोय .महापुरामुळे अनेकांचे घर संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना एक छोटासा आधार म्हणून दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मार्फत संस्थापक परम जवरे व सचिव विजय डाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्य हाती घेण्यात आले आहे. याची सुरुवात दिनांक २५ जुलैपासून इंदापूर येथून झाली. यापुढे दररोज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मार्फत मदती पोहचवल्या जाणार आहेत.
close