प्रतिनिधी : आसावरी वायकर
डॉक्टर्स डे
तो एक डॉक्टर असतो.
जो रडत येणाऱ्या पेशंटला हसत पाठवतो.
तो एक डॉक्टर असतो.
जो स्वतःचे डोळे मिटत नाही
कारण रुग्णाचे डोळे त्याला मिटू द्यायचे नसतात.
तो एक डॉक्टर असतो.
जो स्वतःचे हसु उपचारात बदलतो.
औषधे आजाराला बरे करतात. पण डॉक्टर मात्र रुग्णांना बरे करतात. आज डॉक्टर्स डे देशातील, राज्यातील आणि माझ्या अहमदनगर जिल्ह्यातील तमाम डॉक्टरांना माझा सलाम. डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा देवदूत असतो. डॉक्टरांच्या कौशल्याने रुग्णांना जीवदान मिळालेले आहे.
आज किती डॉक्टर करोनाच्या काळात नावाजले गेले ज्यांनी खरंच रुग्णसेवा हीच प्राधान्य मानली. दिवस-रात्र सतत संसर्ग रुग्णांच्या सहवासात येऊन उपचार करणे ही काही साधी व सोपी गोष्ट नाही.
त्यातही जर एखादी गरोदर माता असेल, ज्येष्ठ नागरिक असेल अथवा दिव्यांग रुग्ण असेल मग तर डॉक्टरांची खरी कसोटी लागते. प्रातिनिधिक स्वरूपात अशाच डॉक्टरांचा खास उल्लेख करता येईल ते म्हणजे सोलापूरचे डॉक्टर विजय अंधारे. त्यांनी मातेचे हृदय तब्बल 42 मिनिटे बंद ठेवत यशस्वी शस्त्रक्रिया करत आई व गर्भातील तानुल्याचा जीव वाचवला.
अहमदनगर जिल्ह्याचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे आणि माणुसकीचा झरा नवे तर समुद्रच असे डॉक्टर रजनीकांत आरोळे सेवेमुळे रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी ठरले आज त्यांची मुले त्यांचा मानव सेवेचा वारसा जसाच्या तसा चालवित आहे खरच या डॉक्टरांना एकदा सल्यूट.
मंडळींनो कधीतरी आपण डॉक्टरांवर नाराज होतो पण त्यांच्यातही भाऊ, वडील, मुलगा ही नाती दडलेली असतात हे समजून घेऊयात ना जरा.
अभिनेता अक्षय कुमार यांनी डॉक्टरांवर खूप सुंदर व्हिडिओ कोरोना काळात प्रसारित केला. आज डॉक्टर्स डे निमित्ताने व्यक्त होत सर्व डॉक्टरांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा व खूप खूप धन्यवाद.
कृषी दिन
काळ्या मातीत मातीत तिफन चालते
पिक हालती डोलती जणू करती भजन
गव्हा जोंधळ्यात तवा सोन चांदी लकाकते.
आज महाराष्ट्र कृषी दिन. हरितक्रांतीचे महाराष्ट्रातील प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने हा दिन कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
अन्न गवत कापडाचे तंतू प्राणी मध तसेच वनस्पती यांचे व्यवस्थित उत्पादन म्हणजे शेती आणि या सर्वांचे व्यवस्थापन करणारा म्हणजे शेतकरी.
खरंच हा अन्नदाता, बळीराजा अडचणींवर मात करतोय पण आम्हाला उपाशी ठेवत नाही
शेतकऱ्यांना आज खरच. सांभाळण्याची वेळ आली आहे शेतीमालाचा कमी भाव, अनियमित पर्जन्यराजा, वेगवेगळे कायदे यामध्ये शेतकऱ्याचे खरंच नुकसान होत आहे कोणीच कोणाचा विचार करेनासे झाले आहे.
मंडळींनो आपण सारे भारतवासी माणुसकीच्या नाळेने पुन्हा जोडुयात. आणि देशातील शेतकऱ्यांची वानवा, त्यांचे प्रश्न यावर थोडा अभ्यास करूयात शासन दरबारी प्रत्येकाला न्याय मिळेल अशी पावले उचलूयात. कारण व्यवस्था ही खूप महत्त्वाची असते. हे लेखन वाचणारे नक्कीच ज्येष्ठ अनुभवी आहेत.
कमाल जमीन धारणा कायदा समजून घेऊयात. आमची काळी आई कमीत कमी खर्चात सुपीक कशी बनेल, अधिक उत्पादन कशी देईल सगळ्यांच्या बाळांना सुदृढ व निरोगी कृषी ठेवेल, आजारांपासून वाचवण्यासाठी सेंद्रिय शेती यावर सखोलपणे काय करता येईल यासाठी संघटित होऊयात. अभ्यास करून समजून घेऊयात एकेक घटक. खूप जरी नाही तरी काही प्रमाणात याचा विचार नक्की होईल या सकारात्मक भावनेने पुन्हा एकदा बळीराजाला सलाम व कृषी दिनाच्या शुभेच्छा.
भारतीय पोस्टल वर्कर्स डे
डाकिया डाक लाया
खुशी का पैगाम कहीं,
कहीं दर्दनाक लाया।
आज राष्ट्रीय पोस्टल कामगार दिन. आमच्या सर्व टपाल कामगारांच्या योगदानाबद्दल आम्ही आज सन्मान करत आहोत. टपाल कर्मचारी आमचे mail आम्हाला वेळेवर कसे पोचतील यासाठी कार्यरत असतात.
पूर्वी सायकलची बेल वाजवत पोस्टमन काका खाकी कपड्यात हजर व्हायचे पत्र म्हणून आवाज द्यायचे आवर्जून घरातल्यांची चौकशी करायचे जर एखाद्याला वाचता येत नसेल तर त्याला पत्र वाचून दाखवायचे पत्रातून निकाल नोकरीची ऑफर सैन्यातील मुलाची खुशाली असायची तर कधी दुःखद घटना पोस्टमन हा एक समाजातील महत्त्वाचा घटक म्हणून समजला जायचा आज सोशल मीडियाने जरी काही प्रमाणात यांची जागा घेतली असेल पण अजूनही रजिस्टर कुरियर स्पीड पोस्ट यासारखी कामे मात्र पोस्ट कडूनच चालतात.
संदेश वाहक म्हणून कार्यरत असणारे सर्व कामगार यांना त्यांच्या कामासाठी आपण सर्व धन्यवाद देऊयात..

