*'डॉक्टर डे' दिनानिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या डॉक्टरांना शुभेच्छा*
इंदापूर प्रतिनिधी:
डॉक्टर डे चे औचित्य साधत राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील डॉक्टरांना फोन द्वारे शुभेच्छा देत कोरोना पार्श्वभूमीवर देशातील डॉक्टरांनी जे मनोधर्य दाखवत रुग्णांची सेवा केली त्याचे त्यांनी कौतुक केले तसेच त्यांचे आभार मानले.
एक जुलै सर्वत्र डॉक्टर डे म्हणून साजरा होत असतो. डॉक्टरांना देवाचे रूप मानले जाते. रुग्ण, नातेवाईक यांच्यासाठी डॉक्टर हे देवदूत असतात. देशात व जगात सध्या कोरोनाचे मोठे संकट असताना या संकटात मोठ्या हिमतीने, ताकतीने हे संकट दूर करण्यामध्ये डॉक्टरांचे योगदान मोठे आहे. डॉक्टरांनी या संकटात लोकांचे प्राण वाचण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. याचे कौतुक व्हावे तसेच त्यांच्याशी संवाद व्हावा या दृष्टीने आज डॉक्टर डे च्या निमित्ताने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील डॉक्टरांना फोनच्या माध्यमातून शुभेच्छा देत त्यांचे आभार मानले.
डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांनी लोकांच्या सेवेसाठी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेले योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केले.

