shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तालुकास्तरीय पिक स्पर्धेमधे जनार्धन नलवडे यांना प्रथम पुरस्कार प्रदान..!!

प्रतिनिधी : शंभुराजे फरतडे
करमाळा : (दि .१) :  तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने कृषी दिनाच्या निमित्ताने आयोजीत पीक स्पर्धेमधे खडकी येथील करमाळा तालुका खरेदी - विक्री संघाचे उपाध्यक्ष जनार्धन नलवडे यांची तालुकास्तरीय हरभरा (सर्वसाधारण गट ) या पिकासाठी प्रथम क्रमांकावर निवड करण्यात आलेली आहे . कृषी दिनाच्या निमित्ताने कृषी कार्यालयात नलवडे यांचा माजी आ .नारायण पाटील यांचे शुभहस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला . 


यावेळी कृषीभूषण नामदेवराव साबळे, उपसभापती दत्ता सरडे, पंचायत समिती सदस्य अतुल पाटील, माजी सभापती शेखर गाडे, तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, मंडळ अधिकारी अनिल चव्हाण, कृषी साहाय्यक आर के शिंदे, चौधरी यांचेसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते . 


जनार्धन नलवडे यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झालेबद्दल माजी आमदार जयवंतराव जगताप, आमदार संजयमामा शिंदे, करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभव जगताप, जगताप गटाचे युवानेते शंभुराजे जगताप, मांगी सोसायटीचे चेअरमन सुजीत बागल, चिखलठाणचे सरपंच चंद्रकांत सरडे, आदिनाथचे माजी संचालक तानाजी झोळ,, करमाळ्याचे माजी उपनगराध्यक्ष अँड .कमलाकर वीर, रावगावचे सरपंच दादासाहेब जाधव, पाडळी सोसायटीचे  चेअरमन शहाजी शिंगटे, बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय अडसूळ, खडकी सोसायटीचे चेअरमन संतोष शिंदे, पोथरे सोसायटीचे माजी चेअरमन दादासाहेब साळुंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लबडे, बाजार समितीचे संचालक औदुंबर मोरे आदींनी अभिनंदन केले .
close