प्रतिनिधी- रफिक शेख
नारायणडोहो (दि .१) : संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोना आजाराबाबत मोठी भिती पाहायला मिळते मात्र या महामारीच्या संकटात आपुलकी , धीर आणि रुग्णांना दिलासा देऊन योग्य उपचार देण्याचं काम नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील मोरया क्लिनिकचे डॉ.रोहित करांडे करीत आहेत. कोरोना महामारीच्या संकटात अनेक हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लूट होत असल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो.
मात्र या महामारीच्या संकटात ना नफा ना तोटा या तत्वावर रुग्णसेवा करण्याचं काम डॉ.रोहित करांडे करीत आहेत. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत नगर तालुक्यातील टाकळी काझी, सांडवा,नारायणडोह, उक्कडगांव, कोल्हेवाडी, मदडगाव , दशमीगव्हाण,चिचोंडी पाटील या गावांतील नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक आर्सेनिक गोळ्यांचे वाटप डॉ. करांडे यांनी केले.
२०२० मध्ये साईनाथ कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९९ टक्कयांवर आणले. सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. टाकळी काझी येथे नगर तहसीलदार यांच्या परवानगीने कोविड सेंटर सुरु केले. आतापर्यंत पंचक्रोशीतील जवळपास ८५० रुग्णांवर उपचार केले.त्यामध्ये क्वारटांईन,विलगीकरण,योग्य आहार ,योग्य उपदेश देण्याचं काम केलं.
अहमदनगरमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्यानंतर अनेक रुग्णांना बेड मिळण्यासाठी अडचणी येत होत्या. ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला त्या परिस्थितीत मार्केटयार्ड परिसरात साईनाथ हॉस्पिटल येथे कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना आणि ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे अशा गरजू रुग्णांसाठी 25 बेडचे हॉस्पिटल सुरू करण्यात आले.
जनसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून सेवा देणारे डॉक्टर रोहित करांडे कोरोना महामारीच्या संकटातही रुग्णांशी आपुलकीने,मानसिक आधार देऊन, माणुसकी जपत आहेत.डॉ. रोहित करांडे हे राधाबाई काळे महाविद्यालयाचे मा.प्राचार्य प्रा.डॉ. मनोहर करांडे यांचे चिरंजीव तर जिल्हा सहकारी बँकेचे मा.व्हा.चेअरमन श्री.संपतराव म्हस्के यांचे भाचे आहेत.
रोहित करांडे सारख्या सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या ,संकटात माणुसकी जिवंत ठेवणा-या आणि रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या डॉक्टरांना शिर्डी एक्सप्रेस टीमच्या वतीने सलाम !

