मनसेच्या कार्यकर्ते प्रकाश पवारच्या विरोधात गुन्हा दाखल...
पारनेर पत्रकार संघाच्या वतीनेही निषेध व निवेदन...
नगर- प्रतिनिधी
जिल्ह्यातील पारनेर येथील पारनेर पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विजय भास्कर वाघमारे, वय ५२ यांना आरोपीने मोबाईल नं.९७६६०२७४०७ नंबरवरून फोन करून तू आमच्याविरुद्ध बातम्या छापतो काय असे म्हणत वाईट वाईट शब्दात शिवीगाळ करून पारनेर येथील आंबेडकर चौकात रिव्हॉल्व्हर व तलवार दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सदर घटना ही सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून पारनेर पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यासाठी पोलिस निरीक्षक नितीन कुमार गोकावे व नायब तहसीलदार प्रशांत रणदिवे यांना मंगळवारी देण्यात आले आहे.
विजय वाघमारे हे पारनेर येथे आंबेडकर चौकात असताना आरोपी प्रकाश पवार याने विजय वाघमारे यांना तु कुणाच्या आमदार निलेश लंके व राहुल झावरेच्या जीवावर उड्या मारतो असे म्हणून धारदार हत्यार व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. २६ जुलै रोजी ९.११ च्या दरम्यान ही घटना घडली. पत्रकार विजय भास्कर वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी प्रकाश पवार याच्याविरुद्ध पारनेर पोलिसात भादवि कलम ५०४, ५०६, (२) ५०७ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुरनं. ५३७ दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पो नि नितीशकुमार गोकावे यांनी भेट दिली.
पोसई बालाजी पद्मने हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान पारनेर पोलिसांनी तातडीने आरोपीवर गुन्हा दाखल केला असे असले तरी आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी पारनेर पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

