shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने लोणकर कुटुंबाला न्याय देण्याची मागणी.

भारतीय विद्यार्थी  मोर्चाच्या वतीने
लोणकर कुटुंबाला न्याय देण्याची मागणी.

इंदापूर : प्रतिनिधी(६ जुलै २०२१)
पुणे येथील स्वप्नील लोणकर हा विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा २०१९ मध्ये यशस्वी उत्तीर्ण झाला होता.परंतु  नोकरी वर रज्जू करण्यासाठी ची मुलाखत माघील अडीच वर्षांपासून रखडलेली होती.घरची हलाखीची परिस्थिती आणि त्यात शिक्षणासाठी काढलेले कर्ज व बेरोजगारी या सर्वाला कंटाळुन विद्यार्थ्याने अखेर आत्महत्या केली.ही आत्महत्या नसून संस्थागत खून आहे.असा आरोप भारतीय विद्यार्थी मोर्चाने केला असून लोणकर कुटुंबाला न्याय देण्याची मागणी इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली  आहे.

स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांच्या परिवाराला त्वरित एक कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य देण्यात यावे, परिवारातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होत नसल्याने परीक्षार्थी विद्यार्थी आत्महत्या करत आहेत.त्यामुळे राज्य सरकारने यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन फक्त परीक्षेची औपचारिकता न करता पदावर रुजू करण्यासाठी अंमलबजावणी करावी आणि भरती पूर्ण होईपर्यंत सरकारने यामध्ये लक्ष देऊन पाठपुरावा करावा, इतर सर्व शासकीय रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, कोरोना च्या काळात जर स्पर्धा परीक्षार्थी पदाची पात्रता ओलांडत असेल तर अशा विद्यार्थ्यांना दोन वर्षाची सवलत देण्यात यावी, कोरोना काळात केजीपासून ते पीजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.व विद्यार्थी निराशा कक्षेत जाऊन आत्महत्या करीत आहेत असे होऊ नये म्हणून सरकारने शिक्षण व्यवस्था सुरळीत करावी.अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून सदर सर्व मागण्या सर्व विद्यार्थ्यांकरिता महत्त्वाच्या आहेत आणि त्या पूर्ण करणे सरकारचे कर्तव्य आहे असे नमूद करण्यात आले आहे.

सदरील सर्व मागण्या पूर्ण करण्यात सरकार जर हलगर्जीपणा करीत असेल किंवा अपयशी ठरत असेल तर विद्यार्थी मोर्चा च्या माध्यमातून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात येईल याची सर्व जबाबदारी सरकारची असेल असा इशारा भारतीय विद्यार्थी मोर्चा कडून करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना इंदापूर मधील परीक्षार्थी विद्यार्थी अमित ढावरे म्हणाले की, सध्या मी एमपीएससी चा अभ्यास करीत असून विद्यार्थ्यांची जी दशा सध्या झाली आहे त्याबाबत इंदापूर तहसीलदार यांकडे आम्ही निवेदन सादर केले आहे. या निवेदनाचा शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करून ज्या महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत या मागण्या विनाविलंब तात्काळ मान्य कराव्यात आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.

यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरज धाईंजे,परिक्षार्थी विद्यार्थी अमित ढावरे,नागेश शिंदे,रोहित शिंदे,रोहित ढावरे , विशाल जाधव आदी उपस्थित होते.
close