shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तहसील कार्यालयात वाढत्या वीज बिलाच्या विरोधात सरकारला कंदील भेट देऊन बहुजन मुक्ती पार्टीच्या युवा आघाडी व महिला आघाडीच्या वतीने अनोख्या पद्धतीने केले आंदोलन..!!

इंदापूर तहसील कार्यालयात वाढत्या वीज बिलाच्या विरोधात सरकारला कंदील भेट देऊन बहुजन मुक्ती पार्टीच्या युवा आघाडी व महिला आघाडीच्या वतीने  अनोख्या पद्धतीने केले आंदोलन..!!
इंदापूर: (दि.६ जुलै २०२१) देशात आणि राज्यात सध्याच्या कोरोनाच्या महाभयंकर स्थितीमुळे आणि महागाई वाढल्याने चालू परिस्थितीत जनतेचा विचार करून वाढत्या वीज बिलाच्या विरोधात सरकारला कंदील भेट देऊन इंदापुर मध्ये तहसीलदार यांना वाढत्या वीज बिलाच्या विरोधात व राज्य सरकारने थकीत वीज बिल माफ करून नवीन बिल आकारणी योग्यरीत्या करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व महिला आघाडी तर्फे(दि.६ जुलै ) रोजी निवेदन देण्यात आले.

 यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की, २०० युनिट पर्यंतचे वीज बिल माफ करण्यात यावे. मीटर भाडे कपात करण्यात यावे. विजेचा स्थिर आकार व प्राथमिक भावाप्रमाणे दर आकारणी करावी. सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ थांबवावी. ज्या ग्राहकांनी वीज बिल मार्च २०२० पासून भरले त्याच्यासाठी अभय योजना तयार करावी व पुढील वर्षभरात बिल नील पाठवावे ३० दिवसानंतर रिडींग घेणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह आंदोलन करण्यात आले .
तसेच  महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी सरकार सत्तेवर आली. विज बिल माफीचा तसेच मोफत वीज देण्याचा नारा देऊन सत्तेमध्ये आली. परंतु सत्तेत आल्यानंतर वाढत्या वीज बिल आकारणी च्या संदर्भामध्ये विज बिल मोफत देण्यासंदर्भात ,लोडशेडिंग संदर्भात कोणतेही सरकार आज पर्यंत महाराष्ट्रामध्ये बोलताना दिसत नाही .उलट काँग्रेस, भाजप व आता महाविकास आघाडीचे सरकार बनले आहे त्या सरकारने सामान्य वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणात वीज शुल्क आकारून लूट केली आहे आणि करत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी बहुजन मुक्ती पार्टी चे प्रभारी संजय शिंदे ,तालुका अध्यक्ष बाबासाहेब भोंग, युवा अध्यक्ष राहुल शिंगाडे ,शहराध्यक्ष संतोष शिरसागर, सुरज धाईंजे ,वसीम शेख ,नितीन देशमाने ,भारत मिसाळ गौस सय्यद व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
close