नगर प्रतिनिधी-(शिवा म्हस्के)
नगर तालुक्यातील अनेक गावा बरोबरच गुंडेगावा मध्ये दादासाहेब दरेकर यांच्या संकल्पनेतून मोफत वृक्ष वाटप व लागवड कार्यक्रम हाती घेतला आहे.गुंडेगाव मध्ये वनीकरण विभाग मोठ्या प्रमाणावर आहे.या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी क्षेत्र उपलब्ध आहे. या ठिकाणी वृक्षारोपण करण गरजेच आहे. कोरोना महामारी काळात ऑक्सिजन महत्त्व प्रत्येकाला पटलेले आहे. त्यामुळे नैसर्गिक प्राणवाय किती महत्वाचा आहे हे संपूर्ण जगाला समजलं अनभुव आला आहे.
नैसर्गिकरीत्या ऑक्सिजन मोफत देणारे एकमेव स्त्रोत म्हणजे वृक्ष आहे.येणार्या काळात वृक्ष वाढ झाली तर काही प्रमाणावर अडचणी कमी होतीलच पण आताच जर आपण सर्वांनी मिळून वृक्ष चळवळ उभी केली तर येणाऱ्या काळात भावी पिढी सुदृढ निरोगी राहण्यासाठी मदत होणार आहे.या साठी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक गावातील तरुण या वृक्ष लागवड चळवळीत सहभागी होत आहे यांचा आनंद होतं आहे.
या वेळी नगर-श्रींगोदा राष्ट्रवादी मतदारसंघाचे अध्यक्ष दादासाहेब दरेकर,बाजारा समितीचे सभापती अभिलाष घिंगे, संतोष धावडे संरपच , सतिश चौधरी, नानासाहेब हराळ, मंगेश हराळ,बबन पाटील हराळ,शाम कासार, स्वामिनी प्रतिष्ठान, माऊली कुताळ,चांभुळकर मेजर,आदि मान्यवर उपस्थित होते.

