shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मा.उपसभापती रविंद्र भापकर यांच्या शेष निधीतून आगडगाव देवस्थानाला ५ लक्ष रुपये निधी मंजूर..!!

नगर प्रतिनिधी ‌। (शिवा म्हस्के)
नगर तालुका पंचायत समितिचे मा.उपसभापती रविंद्र भापकर यांच्या शेष निधीतुन आगडगाव ता.नगर देवस्थान येथे शौचालय व इतर आरोग्यविषयक कामासाठी ५ लक्ष रुपये देण्यात आले,रविवारच्या शुभ मुहुर्तावर हा कार्यक्रम पार पडला,श्री.रविंद्र भापकर यांनी नगर तालुक्यात एक वर्ष म्हणुन उपसभापती म्हणून कार्य करताना तालुक्यातील अनेक गावात भरीव निधी दिला आहे,आगडगाव गेल्या चार ते पाच वर्षात भैरवनाथांचे जागृत देवस्थान म्हणून जिल्ह्यात  नावारुपास येत आहे.
 
आणि त्यासाठी निधी देण्याचा निर्णय मा.उपसभापती रविंद्र भापकर यांनी घेतला आहे,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ झोडगे,गोविंद अण्णा मोकाटे,संदेश कार्ले,बाळासाहेब हराळ,मा.सभापती रामदास भोर,मा.सभापती प्रविण कोकाटे,शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत,आगडगावचे सरपंच मच्छीन्द्र कराळे,संतोष शिरसाठ,ग्रामसेवक पोपट गावडे,देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे,साहेबराव गायकवाड,विश्वस्त नितीन कराळे,ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद खाडे,दिपक गुगळे,बाबासाहेब बोरुडे,दिलीप गायकवाड,श्री.संभाजी कराळे, पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.
           
यावेळी गोविंद आण्णा मोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले,प्रताप पाटील शेळके यांनी अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना देवस्थान साठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले,देवस्थानसाठी भविष्यात मोठा निधी उपलब्ध करून देऊ,आगडगाव जिल्ह्यात मोठा नावलौकिक मिळवत आहे आणि आपण सर्वजण त्यासाठी कटीबद्ध राहू असेही शेळके म्हणाले,उपस्थित सर्वांनी रविंद्र भापकर यांच्या कामाचे भरभरुन कौतुक केले.
close