आमदार महेंद्र शेठ दळवी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख...
राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी:-,
ता. 12: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी युती आघाडी होईल किंवा नाही याची वाट न पाहता कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणुक लढण्यासाठी तयार राहण्याचा नारा जिल्ह्यातील शिवसेनिकांच्या कानात फुंकण्यात आला आहे. यासाठी आतापासूनच कामाला लागा आणि त्यासाठी सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवा, असा संदेश शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आ. महेंद्र दळवी यांनी दिला आहे. अलिबाग शिवसेना प्रमुख राजा केणी यांच्या पुढाकाराने अलिबाग येथे रविवार (ता. 11) रोजी शिवसेना रायगड जिल्हा कार्यकारीणी सभा घेण्यात आली, त्यावेळी आगामी निवडणुकांसाठी ही रणनीती आखण्यात आली.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनयांनी सेनाभवन येथे घेतलेल्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर शिवसेना रायगड जिल्हा कार्यकारीणीची बैठक अलिबाग येथे पार पडली. या बैठकीत 11 ते 24 जुलै दरम्यान राबवण्यात येणाऱ्या शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी आणि संपर्कप्रमुख विलास चावरी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ज्या ज्या वेळी शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढलेल्या आहेत, तेव्हा चांगले मताधिक्य मिळाले असल्याचा विश्वास या नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी आ. महेंद्र दळवी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, राज्यातील सत्तेत आहोत आपण असलो तरी गाफील राहून चालणार नाही. पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर द्या. शिवसेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झालेली आहेत, सत्तेच्या माध्यमातून केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवा. मतदारांशी संपर्क वाढवून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवा, यातून शिवसेना अधिक बळकट होईल. सध्याही शिवसेनेचे तीन आमदार जिल्ह्यात आहेत, सर्वाधिक मतदार शिवसेनेचे आहेत, जिल्हापरिषदेत सत्ता मिळविण्याचे सामर्थ शिवसैनिकांमध्ये आहे, ते वेळीच जाणून आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी केले. पक्ष संघटना वाढीसाठी राज्यभर शिवसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या माध्यमातून लोकापर्यंत पोहोचण्याची संधी आहे ती सोडू नका आणि जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा. असे दळवी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले.
आगामी काळात नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परीषदेच्या निवडणूका येवू घातल्या आहेत. त्या स्वबळावर जिंकण्याच्या दृष्टीने कामाला लागा, असेही त्यांनी सांगितले. संपर्कप्रमुख विलास चावरी यांनीही शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हापरिषदेत सत्तेत येण्यासाठी सर्व अनकुल परिस्थिती आहे, यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संघटीतपणे कामाला लागण्याची गरज अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख राजा केणी यांच्या संकल्पनेतूनां 11 ते 24 जुलै रोजी सुरू करण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानात डिजिटल व्हॅन चे उदघाटन करून सदर डिजिटल व्हॅन द्यारे शासनाच्या विकासकामांची माहीती जनतेपर्यंत पोचवणार .
यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, महिला संघटिका दिपश्री पोटफोडे, कामगार नेते दीपक रानवडे, युवासेनेचे सुधीर ढाणे, पेण उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, पेण तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, मुरूड तालुकाप्रमुख ऋषिकांत डोंगरीकर यांच्यासह सर्व उपजिल्हाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख उपस्थित होते


