shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवकांना व्यवसायात बळ देऊन जास्तीत जास्त प्रगतीच्या मार्गावर आपण कसे नेऊ हे पुढच्या काळात काम करणे गरजेचे. अंकिता पाटील.

युवकांना व्यवसायात बळ देऊन जास्तीत जास्त प्रगतीच्या मार्गावर आपण कसे नेऊ हे पुढच्या काळात काम करणे गरजेचे. अंकिता पाटील.
इंदापूर: वडापुरीत काटकर कॉम्प्लेक्स येथील सोळा गळ्यातील प्रथम व द्वितीय गाळ्यांमध्ये श्री माऊली काटकर यांच्या श्री गोधन पशुखाद्य विक्री व माऊली लाईट हाऊस या दुकानाचे उद्घाटन बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या शुभ हस्ते दिनांक १२ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झाला. 

यावेळी माजी सरपंच नारायण नलवडे, काटकर कॉम्प्लेक्स चे व प्रगतशील बागायतदार भागवत काटकर, दत्तात्रेय गायकवाड, युवा नेते पांडूरंग शिर्के ,बापूसाहेब चंदनशिवे ,संतोष देशमुख, राम महाराज अभंग ,ज्येष्ठ नागरिक बबन बोधले व ग्रामस्थ आणि काटकर मित्र परिवारातील मित्रमंडळी उपस्थित होते.
या उद्घाटनाप्रसंगी अंकिता पाटील म्हणाल्या की, श्री गोधन पशु खाद्य विक्री व माऊली लाईट हाऊसचे उद्घाटन झाले असून वडापुरी गाव आणि माजी सहकार संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाते चांगले असून अशा गावातील    एक तरुण युवक चांगला उपक्रम राबवून या व्यवसाय क्षेत्रात जोखीम घेऊन 

पुढाकार घेत आहे. आणि आपल्याला व्यवसाय करून दोन पैसे कसे मिळावेत या धोरणातून हा उपक्रम वडापुरी गावात राबवत आहे . त्यांना या पुढच्या काळात आपण सहकार्य करण्याची गरज आहे. खरतर आज आपण पाहतो युवा पिढी चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहे. आज आपणास माहीत आहे की, नोकरीची परिस्थिती महाराष्ट्रातच नव्हे तर देशांमध्ये कोरोणामुळे कशी झाली आहे. जेवढे काही युवक मला भेटतात नेहमी मी एकच सल्ला देत असते की, तुम्ही काही करून व्यवसायांमध्ये जावा. असे नाही की तुम्ही खूप मोठ्या प्रकारातून सुरुवात करा तर तुम्ही लहान व्यवसायातूनही सुरुवात करू शकता. जगात वावरत असताना वास्तविक गोष्टी लक्षात येतात यामधून जी जडणघडण होती ती भारताच्या युवा पिढीला अत्यंत महत्त्वाची आहे असे मला वाटते. 
त्या पुढे म्हणाल्या की, रोहित काटकर यांनी या कॉम्प्लेक्स च्या माध्यमातून गावा समोरच नव्हे तर पूर्ण तालुक्यासमोर या गाळ्याच्या व्यवसायाचे उत्तम उदाहरण ठेवले आहे. वडापुरी गावातील काटकर कॉम्प्लेक्स एक उत्तम आणि स्पेसिफिक स्वरूपात अतिशय सुंदर पद्धतीने तयार झाले आहे. या कॉम्प्लेक्स च्या ठिकाणी सुंदर वातावरण निर्माण झाल्याने गावातील ग्राहका बरोबर इंदापूर अकलूज रोड वरून येणारे जाणारे ही ग्राहक या व्यावसायिकांच्या दुकानाकडे आकर्षिले जाणार आहेत.

कोरोना चा काळ आहे या काळात एक दीड वर्षापासून निवांत घरी बसूनही बऱ्याच ठिकाणी राजवर्धन दादा हर्षवर्धन पाटील साहेब नेहमी सगळीकडे जात असतात भेटत असतात. अशा युवकांनी सुरू केलेल्या स्टार्ट अप कन्सेप्ट मधील जे दुकाने हार्डवेअर चे दुकाने रेस्टॉरंट चहा चे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड असतील असे हॉटेल तालुक्यात सगळीकडे युवकांनी खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय क्षेत्रात एक चांगली उंची घेतली आहे .पुढाकार घेतला आहे. निश्चितच ते चांगले यश मिळवत असताना तालुक्यात दिसत आहेत .वेळ बदलत चाललेली आहे.  मोबाईल फोन मुळे संपर्क मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अशा काळात जे काही नवनवीन टेक्नॉलॉजी आपल्या कामात कशी आणू शकतो हे पाहून पुढल्या काळामध्ये असे उपक्रम राबवणे अत्यंत गरजेचे आहे .कोरोना चा काळ संपला नाही .केसेस कमी झाल्या असल्या तरी तिसरी लाठ खूप मोठ्या प्रमाणात येण्याची संभावना असून आपण सर्वांनी घराबाहेर पडताना निश्चितपणे मास्क वापरा .तालुक्यात लसीकरण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे पहिल्या डोस नंतर दुसरा डोस घेणे ही खूप महत्त्वाचे आहे
यावेळी संपूर्ण काटकर कुटुंबीयांचे मनापासून मी अभिनंदन करून आभार मानते या ठिकाणच्या संपूर्ण युवक सहकारी मित्र असतील वडापुरी गावातील सर्व युवक असतील या सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छिते आपण अशाप्रकारे  एकमेकांच्या पाठीमागे उभा राहून आणि आपल्या युवकांना बळ देऊन त्यांना जास्तीत जास्त प्रगतीच्या मार्गावर आपण कसे नेहु शकू हे आपण इथून पुढच्या काळात काम करणे गरजेचे आहे असे मत यांनी व्यक्त केले.
close