केंद्र सरकारने वाढवलेल्या दरवाढीविरोधात इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिलांच्या वतीने तहसील कार्यालय येथे जाहीर निषेध करत निवेदन सादर..!!
इंदापूर:(१२ जुलै २०२१) रोजी केंद्र सरकारने वाढवलेल्या गॅस दर व पेट्रोल डिझेल दरवाढ तसेच खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरवाढीविरोधात इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिलांच्या वतीने जाहीर निषेध करून सदर निवेदन नायब तहसीलदार लावंडे साहेब यांच्याकडे देण्यात आला.
यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष अश्विनी राऊत- कुर्डे . शहराध्यक्ष स्मिता पवार, करिष्मा शहा ,सुरेखा कुर्डे, अलका कुबेर, बायडाबाई कुर्डे, वैशाली कुर्डे, अमोल राऊत, लता राऊत, ज्योतीराम कुर्डे, वसीम बागवान, विजय भाऊ शिंदे ,अक्षय माळी इत्यादी उपस्थित होते.
मोदी सरकारने जनतेला खोटी आश्वासने देत आज देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाट लावलेली आहे. पेट्रोल डिझेल व गॅस यांचे दर प्रचंड प्रमाणात वाढवून सर्वसामान्यांचे जीवन मुश्किल केलेले आहे. आज या संवेदनशील विषयासाठी या असंवेदनशील सरकारचा आम्ही इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या महिलांच्या वतीने जाहीर निषेध करतो. मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व गॅस वर अव्वाच्या सव्वा कर लावून प्रचंड दरवाढ केलेली आहे. तसेच खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. जनतेच्या हातातील घास ओडण्याचे पाप केलेले आहे. त्यामुळे आम्ही या दरवाढीचा जाहीर धिक्कार करत आहोत तसेच मोदी सरकारने ही दरवाढ लवकरात लवकर कमी करावी असे या निवेदनात म्हटले असून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर व जिल्हाध्यक्ष प्रदिप दादा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे निवेदन देत आहोत याची नोंद घ्यावी अशा प्रकारचे निवेदन इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष अश्विनी राऊत कुर्डे व शहर कार्याध्यक्ष स्मिता पवार यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.

