shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवळाली तसेच गुहा परिसरातील दारू अड्यावर पोलिसांचे छापे..!!

राहुरी तालुक्यातील देवळाली - प्रवरा परिसरात नुकत्याच दारू अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली  असतांना देखील पोलिसांनी आता पुन्हा एकदा  याच परिसरात छापे टाकण्याचे सत्र सुरू केले. रविवारी देवळाली तसेच  गुहा या परिसरात एकाच वेळी दोन ते तीन ठिकाणी याच भागात अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असतांना रु.२७०० इतका मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 




राहुरी येथे कार्यरत असलेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक नंदकुमारदुधाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांनी रविवार तारीख ११ जुलै रोजी दुपारी तीन वाजता येथील परिसरात हे छापे टाकले असुन त्यांना अवैध मार्गाने दारू विक्री करतांना काही अवैध  व्यवसायिक आढळून आल्याने खालील प्रमाने आरोपी रमेश रघुनाथ वर्पे,सोमनाथ महादेव बर्डे,अजय रामराव जाधव या तीनजणांविरुद्ध ५३८/२०२१ मुंबई  दारूबंदी कलम कायदा ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राहुरी पोलीस ठाण्यात पो.नि. नंदकुमार दुधाळ हे रूजु झाल्यापासून त्यांनी अवैध दारू अड्यावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे त्यामुळे तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असुन या कारवाई नंतर सर्वसामन्या जनतेमधून  समाधान व्यक्त केलं जात आहे.                


बातम्या आणि जाहिराती करीता संपर्क दिपक हरिश्चंद्रे ,राहुरी (तालुका प्रतिनिधी )7350591600

close