पुनाळ । प्रतिनिधी(सुरेश वडर):- मंगळवार 13जुलैय रोजी होणाऱ्या नरविर शिवा काशिद यांच्या पुण्यतिथीच्या पुर्व संधेला नेबापुर(बुधवार पेठ पन्हाळा)येथील समाधी परीसराची स्वच्छा कोल्हापूर जिल्हा नाभिक महामंडळ, विविध संस्था व संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली विर शिवा काशिद संवर्धन समीती,इचलकरंजी शहर ,हातकणंगले व पुनाळ येथील बाहुजन समाजा कडुन करण्यात आली.
परीसरात झुडपे,दगड,धोंडे यांनी व्यापल्यांने समाधी अस्पस्ट दिसत होती .आडतळा निर्माण केलेल्या झुडपे व दगड,धोंडे यांची योग्य पध्दतीने बाजूला करुन समाधी पुर्ववत दिसण्या योग्य केले.
यावेळी विरशिवा काशिद यांचे वंशज आनंदा काशिद यांच्या समवेत मान्यवरांच्या हस्ते समाधीचे पुजा,अर्चा, प्रार्थना,शिववंदना करण्यात आली.सरदार झेंडे,सुनील इंगळे,विनायक चव्हाण,आनंदा काशिद यांनी मानोगते व्यक्त केलीत.
आनंदा काशिद मनोगतात म्हणाले की, छत्रपती शिवाजी राजे यांना वाचवण्यासाठी शिवा काशिद यांनी दिलेले बालीदान हे नाभिक समाजा पुर्ता नसुन संपुर्ण राज्याला स्मरणार्थ राहाणारा एक मावळा आहे. विनायक चव्हाण म्हणाले समाधी परीसरातील मावळ्यांच्या पुतळ्यांचे व परीसरातील विद्युत काम सुस्थीतीत करणे.सरदार झेंडे म्हणाले की,कोरोनाचा प्रभाव असल्याने यावर्षी समाज बांधव व शिव प्रेमीने पुण्यतिथी आपआपल्या गावात सामाजिक उपक्रम राबवुन करावे आसे आवाहन केले.सुनील इंगळे म्हणाले की,पुण्यतिथी दिना निमित्त समाज बांधवांने गरीब जनतेला , जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करावे.
यावेळी मनोज टिपुगडे,सोपान सुतार,नरेंद्र माने,कृष्णात साळोखे, सुरेश वडर,आर्जुन शिंदे,बाबा झेंडे,दिपक कुंभार,बाळासो गुरव,प्रविण जाधव,नेताजी टिपुगडे,संग्राम माटे,बाळासो साळोखे,दिपक चोपडे,अनील झेंडे,सदाशिव सावंत,संतोष सावंत,गजानन शिंदे,संजय मांडरेकर,रविंद्र श्रीसागर मारुती काशिद यासह आदी बहुजन समाज बांधव उपस्थिती होते.

