shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धक्कादायक! घटना पुणे शहरात नवरा-बायको झालेल्या किरकोळ वादातून नवविवाहित डॉक्टर पती पत्नीची आत्महत्या..!!


पुणे:-नवरा-बायको झालेल्या किरकोळ वादानंतर एका नवविवाहित दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याच्या वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी हा प्रकार घडला. एकीकडे डॉक्टर दिवस असल्यामुळे डॉक्टरांप्रती सन्मान व्यक्त केला जात असतानाच अशाप्रकारे दुःखद घटना झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

निखिल शेंडकर (वय 27) आणि अंकिता निखिल शेंडकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर पती पत्नीची नावे आहेत. वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंकिता ही बीएएमएच आहे. तर निखिल बीएएमएस आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचेही लग्न झाले होते. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद नगर परिसरात ते राहत होते. बुधवारी रात्री काम आटोपल्यानंतर निखिल घराकडे येत असताना हे दोघेही पती-पत्नी फोनवर बोलत होते. फोनवर बोलत असताना त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे त्याने रागाच्या भरात फोन कट केला.
रात्री निखिल घरी आल्यानंतर अंकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याला दिसली. या सर्व प्रकाराने नैराश्यात गेलेल्या निखिल यानेही आज सकाळच्या सुमारास गळफास घेत स्वतःचे जीवन संपवले. 

स्थानिक नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
close