shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र जागृत जनमंच ची स्थापना !

प्रतिनिधी : संजय वायकर

जळगाव :(दि .२०) : महाराष्ट्रातील बुद्धिमान, अभ्यासू व विचारवंतानी सुचवल्या प्रमाणे आज महाराष्ट्र जागृत जनमंच ची स्थापना झाली.

डॉ एस एस राणे यांच्या सौजन्याने लोकहितवादी दवाखाना व विद्यार्थी लायब्ररी मधे  जळगाव जिल्हा जागृत जनमंच ची बैठक झाली.त्यात आघाडीचे लढवय्ये शिवराम पाटील, दिपककुमार गुप्ता, अनिल नाटेकर सोबत आधारस्तंभ मोराको हॉटेल चे मालक  सूरज पांडे व बेंडाळे कॉलैजचे निवृत्त प्राचार्य डॉ एस एस राणे आवर्जून उपस्थित होते.जळगाव जिल्हा जागृत जनमंच चे कार्यकर्ते डॉ धर्मेश पालवे, अमोल कोल्हे, गुरूनाथ सैंदाणे,अजय पाटील,राकेश वाघ,विजया पाटील,धनंजय,अमित   यांनी आपले अनुभव कथन केले.आपले कार्यविस्तार जळगाव जिल्हा पलीकडे करण्याचा मानस व्यक्त केला.जळगाव शहरातील तरूण विद्यार्थ्यांनी आपल्या नोकरीच्या,व्यवसायाच्या समस्या मांडल्या.त्यावर शिवराम पाटील व दिपककुमार गुप्ता यांनी उत्तर दिले कि,आपल्या समस्या या राजकीय व प्रशासकीय दोषांमुळे निर्माण झालेल्या आहेत.

पण आपण सभ्यतेचा बुरखा पांघरूण घरातून मजा पाहातात. जसा सिनेमा पाहातात. हे योग्य नाही. आपण नागरिक आपल्या वार्डामधील उमेदवारांना रुबरू ओळखत असूनही पैसे घेऊन मतदान करतात.गुन्हेगारांना निवडून देतात.त्याचा हा परिणाम आहे.अवैध धंदे करणारे आमदार, खासदार निवडून देतात, त्याचा हा परिणाम आहे.जर एखादा उमेदवार गुंड,गुन्हेगार आहे तर त्याच्या विरोधात निवडणुकीत प्रचार केला पाहिजे. पैकी चांगला उमेदवाराचा प्रचार घरच्या भाकरी खाऊन केला पाहिजे. पण असे करण्याचे आमच्या नागरिकांमधे धाडस नाही. परंतु परिणाम मात्र चांगला पाहिजे. कसे शक्य आहे?

आम्हाला जे ज्ञान आहे ते पोलीस, न्यायाधीश, आधिकारी यांच्या पेक्षा कमी असूनही लढतो.कारण आम्ही समाजाप्रती,देशाप्रती प्रामाणिक आहोत.नोकर तर पगार, पेन्शन साठी नोकरी करतात.सोबत लाचलुचपत ही घेतात.वरून त्यांना सरकार चे संरक्षण असते.त्यामुळे तेच चोर असूनही त्यांना प्रश्न करणाऱ्यांवर कलम ३५३ चे गुन्हे दाखल करतात.पोलीस सामाजिक भान न ठेवता गुन्हे नोंदवतात.त्यांनाही असे भ्रष्टाचार उघड करणारे नको असतात.न्यायाधीश सुध्दा चष्मा नाकावर घेऊन आमच्या कडे  पाहातात.आता स्वातंत्र्य मिळाले. टिळक,गांधी, नेहरू सारखे आंदोलन करून जेलमधे जावे लागणार नाही. असे वाटते.पण प्रत्यक्षात उलटेच होत आहे. चोरी करणारे कर्मचारी, आधिकारी ,पुढारी हे सरकार चे जावई बनलेत.कोणी भ्रष्टाचार विरोधात तक्रार केली तर त्याला डोळे वटारून बघतात.बोलव रे पोलिसांना!तक्रार नोंदव.यांनी सरकारी कामात अडथळा आणला,असा. पोलिसांना चहापाणी दिली कि ते हत्तीला म्हैस किंवा म्हसीला हत्ती लिहून एफआयआर नोंदवतात.एक एक एफआयआर, चार्जशीट निपटवत आमचे दहा वर्षे निघून जातात. तेंव्हा वाटते,भारत स्वतंत्र झाला तो आमच्यासाठी नाही फक्त सरकारी चोरांसाठी.

अशा समस्या व त्यावर इलाज याप्रमाणे चर्चा झाली.आपल्या वार्डातून चोर नगरसेवक बनू नये,चोर आमदार खासदार बनू नये यासाठी निवडणुकीत प्रचार केला पाहिजे. आमच्या जिल्ह्यातील चोर,भ्रष्ट माणूस आमदार बनू नये.यासाठी आम्ही कोणत्याही स्तरापर्यंत लढले पाहिजे. चोर आमदारांमुळे विकास तर होत नाही उलट जिल्हा बदनाम होतो. आमच्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन वाईट बनतो.जळगाव चे घरकुल घोटाळातील चोर धुळे जेलमधे होते,तेंव्हा धूळे जिल्ह्यात, शहरात  जाणे लाजिरवाणे झाले होते.तोंड लपवून पतली गल्लीतून निघून जावे लागत होते.असे पुन्हा होऊ नये.किमान माझ्या जिल्ह्यात तरी होऊ नये.म्हणून आम्ही राज्यपालांना जाऊन विरोध नोंदवला.राज्यपालांनी आमचे स्वागत केले.

प्रत्येक जिल्ह्यातील असे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते सोबत घेऊन जिल्हानिहाय जागृत जनमंच स्थापण्याचे ठरवले.असा लढा देण्याची फक्त जळगाव नव्हे महाराष्ट्रात गरज आहे.

महाराष्ट्र जागृत जनमंच मधे आधिकतम जेष्ठ, निवृत सदस्य जास्त प्रभावी ठरतात.कारण त्यांचेकडे प्रशासकिय कामाचा अनुभव असतो.कायद्याची माहिती असते.पेन्शन मुळे रोजीरोटीची ददाद नसते. मूले बाळे संसारात रमल्यामुळे घरादारात जास्त महत्त्व नसते.अशा लोकांनी उर्वरित आयुष्य समाजसेवेत घालवावे.असे आवाहन करण्यात आले.बैठकीत सर्वांनी प्रतिसाद दिला.तसाच प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळेल.कार्य वृद्धिंगत होईल.या दिशेने वाटचाल सुरू करीत आहोत.


....शिवराम पाटील.

  9270963122.

जळगाव जिल्हा जागृत जनमंच.

close