shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नागपाडा पोलिसाची कौतुकास्पद कामगिरी..!!



विनया मेढेकर । पनवेल
नागपाडा । दिनांक - 19/07/2021 रोजी कामाठीपुरा 9 वी गल्ली ,नागपाडा, मुंबई -08 एम.आर. रोड याठिकाणी एका बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून एक 07 वर्षे वयाचा मुलगा नामे आरुष तेजस गायकवाड रा.ठी. -सिद्धार्थनगर , डि ब्लॉक,रु. न . 41, नागपाडा हा पडला असता त्याला ताबडतोब मदत म्हणून पोलीस नाईक क.- 00867 विशाल महादेव जाधव यांनी त्यांचे मित्र श्री.गोपाल परदेशी समाजसेवक NCP सरचिटणीस, दक्षिण मुंबई यांच्या वैयक्तिक वाहनाने जे.जे. रुग्णालय येथे वेळेवर दाखल करुन त्या मुलास योग्य तो उपचारार्थ मदत केली. 

त्या अनुसंगाने कामाठीपुरा 9 वी गली, भाजी मार्केट, एमआर रोड, दिनांक 20/07/2021 रोजी मान.आमदार श्री.अमीन पटेल नगरसेवक वॉर्ड क्र 213, मान श्री जावेद जुनेजा, माजी अध्यक्ष भाजी मार्केट श्री. राजा मोरे यांच्या हस्ते त्यांच्या केलेल्या महत्त्वपूर्ण कामागिरीबद्दल त्यांना शाल व फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
close