shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत पंढरपूर मध्ये दाखल..!!

या वर्षीचा मान वर्धा जिल्ह्यातील केशव शिवदास कोलते इंदुबाई केशव कोलते यांना वारकरी संप्रदायातुन पुजेचा मान मिळाला आहे...

नगर प्रतिनिधी-(शिवा म्हस्के):
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा।
चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा।।
जय देव जय देव जय पांडुरंगा।।
रखुमाईवल्लभा राहोच्या वल्लभा पावें जिवलगा
ज्ञानेश्वर चालती मंद मंद पाऊली 
विठ्ठल मंदिरात काकडा आरती, महापूजा, महानैविध्य, पोशाख, धुपारती, पाद्यपूजा, शेजारती इत्यादी विविध नित्योपचार केले जातात पण 
आषाढी एकादशी निमित्त  विशेष अशी शासकीय पुजेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वतः पंढरपूरला हजर राहणार आहेत.ते कुटुंबासोबत पंढरपूरकडे रावाना झाले असून , त्यांनी स्वतःच गाडी चालवली आहे.‌आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरला दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची धर्मपत्नी रश्मी ठाकरे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित राहतील.त्यांनंतर मध्यरात्री अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापुजा पार पडणार आहे.

          

आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी महाराष्ट्रातील एका कुटुंबियांना पुजेचा मान मिळत असतो. या वर्षीचा मान वर्धा जिल्ह्यातील केशव शिवदास कोलते आणि इंदुबाई कोलते यांना मिळाला आहे.ते यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत शासकीय महापुजा करतील आम्हाला महापुजेचा मान मिळाला आहे. त्यामुळें आमच्या कष्टाचे फळ मिळालं  आहे. असं कोलते म्हणाले या वर्षीचा शासकीय पुजा सर्व शासकीय नियम पाळुनच पुजा पार पडेल.
close