shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाशिप्र संस्थेत आल्यानंतर माहेरी आल्याचा आनंद वाटतो..!!

 
व्यक्तीचा सर्वांगिण विकास शिक्षणाच्या संस्कारातुन होतो-पंकजाताई मुंडे यांचे प्रतिपादन..!!

प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:- 
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था समाजाला संस्काराचे धडे देणारी संस्था असुन शिक्षणातुन व्यक्तीसोबतच सुसंस्कृत समाज निर्मिती होते. शिक्षणातुन ज्ञान मिळेल पण संस्कार जर नसतील तर मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला काहीच होत नाही. ही संस्था केवळ शिक्षण देणारी नसुन संस्कारमय माणुस घडवणारी संस्था आहे. माझं नातं संस्थेसोबत आगळंवेगळं आहे. कधी पण संस्थेत आल्यानंतर आपलेपणाची भावना मनात होते. एवढेच नव्हे तर माहेरी आल्याचा आनंद मिळतो. सामाजिक जाणिव ठेवुन जनकल्याणासाठी संस्थेचे तत्व लोकोपयोगी ठरतात असं प्रतिपादन भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी केले. 

भावी पिढीला संस्कार मिळतील असे कार्यक्रम तुम्ही घ्या. काही दिवसातच राज्याचे राज्यपाल संस्थेच्या कार्यक्रमाला आपण घेवुन येवु असं सांगुन त्यांनी केजच्या आ.नमितात्ााई मुंदडा यांच्या वतीने महाविद्यालयाच्या मुलभुत सोयीसाठी दहा लक्ष रूपयाचा निधी देण्याची सुचना जाहिरपणे केली. 


खोलेश्र्वर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव वर्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये आ.नमिताताई अक्षय मुंदडा, नांदेड विद्यापीठाचे प्रकुलगुरू जोगेंद्रसिंह बीसेन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचे सेवाप्रमुख श्री उपेंद्र कूलकर्णी, कार्यवाह नितीनजी शेटे, अक्षय मुंदडा, सह कार्यवाह चंद्रकांत मुळे, केंद्र संचालक आप्पाराव यादव, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष ऍड.किशोर गिरवलकर, कार्यवाह बीपीनदादा क्षीरसागर, ऍड.मकरंद पत्की, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पुजनसह दत्तोपंत ठेंगडी आणि माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. त्याचबरोबर संस्थेच्या वतीने गरजु शेतकऱ्यांना सेंद्रिय खताचं वाटप पंकजाताई यांच्या शुभ हस्ते झाले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर प्रास्ताविक करताना संस्था कार्यवाह नितीन शेटे यांनी महाविद्यालयाचा इतिहास आणि वर्तमानकाळ सांगताना गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या साठी हे महाविद्यालय चालते. पन्नास वर्ष पुर्ण होताना संघर्षातुन लावलेलं इवलंसं रोपटं वटवृक्षात रूपांंतरीत झालं. यामागे अनेकांचे कठोर परिश्रम आहेत. वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करताना सामाजिक जाणिव आणि समाजाला काही संस्कार देता येईल का?हा विचार आम्ही केला असल्याचे ते म्हणाले. पंकजाताईचं संस्थेला नेहमीच सहकार्य असतं. 

आपलेपणाची भावना त्यांच्या बोलण्यात सतत जाणवत असल्याचं ते म्हणाले. प्रकुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बीसेन आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी असुन कितीही मोठा असलो तरी महाविद्याल्ायात मिळालेले संस्कार माझ्या आयुष्यात परिवर्तनासाठी महत्वाचे ठरले. महाविद्यालय हे व्यक्ती निर्माणाची प्रयोगशाळा असुन शैक्षणिक आत्मविश्र्वास मुला-मुलींच्या मनात निर्माण केला जातो असे त्यांनी सांगितले. आ.नमिताताई मुंदडा यांनी महाविद्यालयाचं कौतुक करून भौतिक सुविधांसाठी दहा लक्ष रूपये पंकजाताईंच्या मार्गदर्शनाखाली देण्याचे मान्य केले. उपेंद्र कुलकर्णी यांनी वर्तमान शैक्षणिक व्यवस्थेवर बोलताना नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्या दृष्टीने संस्थेची होत असलेली वाटचाल यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर बोलताना म्हणाले की, महाविद्यालय त्यागाचं प्रतिक आहे. रोजगार निर्माण करून उपजिविकेचं ज्ञान नव्या पिढीला दिलं जातं. समाजातुन येणाऱ्या सुचना त्याचं अनुपालन करून वाटचाल होते. दरम्यान पंकजाताई यांनी अतिशय वैचारिक भाष्य करताना शैक्षणिक परिस्थिती अाणि संस्कारित माणुस यावर प्रकाश टाकला. कुठल्याही क्षेत्रात संस्कार असतील तर खऱ्या अर्थाने प्रगती झाल्याशिवाय रहात नाही. आपलेपणाची जाणिव संस्थेत आल्यानंतर होते. आजोळी आल्याचा आनंद मिळतो. स्व.प्रमोदजी महाजन, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा ऋणानुबंध संस्थेसोबत राहिला. तोच वारसा पुढे चालवताना सर्वोपरी संस्थेला सहकार्य करत राहु. मागणी केल्याप्रमाणे महाविद्यालयाच्या सोलार प्रकल्पासाठी दहा लक्ष रूपये आ.नमिताताई मुंदडा यांच्या विकासनिधीतुन देण्याचे त्यांनी जाहिर केले. याच कार्यक्रमात त्यांच्या हस्ते पन्नास शेतकऱ्यांना सेंद्रिय खताचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राम कुलकर्णी यांनी केले तर प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी आभार मानले. 

क्षणचित्रे :-


1) पंकजाताईचं आगमन महाविद्यालयाच्या मैदानावर होताच छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना देवुन त्यांचं स्वागत केलं. 
2) पंकजाताईचं भाषण वैचारिक व अभ्यासपुर्ण झाल्यानंतर उपस्थित लोकांनी जाहिरपणे त्यांचे कौतुक केले. 
3) भाशिप्र संस्थेत आल्यानंतर माहेरी आल्याचा आनंद वाटतो असं त्या म्हणाल्या.
4) महाविद्यालयाच्या विकासासाठी आ.नमिताताई मुंदडा यांच्या विकासनिधीतुन दहा लक्ष रूपये त्यांनी जाहिर केले.
5) सुवर्ण महोत्सव काळात राज्यव्यापी शिक्षण परिषदेसाठी आपण महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोशारी यांना निश्चित घेवुन येवु हा शब्दही त्यांनी दिला.
6) संघ परिवाराचा कार्यक्रम घेतल्यानंतर आपण कधीच दुसरा राजकिय कार्यक्रम घेत नाही हे त्यांनी आवर्जुन सांगितले. 
7) कार्यक्रमापुर्वी पंकजाताईनं संघ कार्यालयास भेट देवुन अर्धा तास संवाद साधला.
close