shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विखे पाटील सैनिकस्कूल,लोणी चे विद्यार्थी एन. डी. ए. परीक्षेत चमकले..!!



शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल, लोणीने आपली गौरवशाली परंपरा राखत एप्रिल मध्ये झालेल्या एन. डी.ए. -१ परीक्षेत शाळेच्या कॅडेट सिद्धांत बिडकर व मंदार पिंपळे या  दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले व संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. शाळेचे कमांडंट, प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा तसेच अपार कष्ट, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर हे स्वप्न पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झालो असे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.  


यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मा. आ. राधाकृष्ण विखे पाटील,  माजी जि. प. अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, मा. खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांच्या यशात शाळेचे कमांडंट कर्नल डॉ. भरत कुमार, मा. ज्योती कौशिक मॅडम, शाळेचे प्राचार्य श्री. राजेश माघाडे , समन्वयक श्री. इसाक पठाण यांचा अनमोल वाटा असून एन.डी.ए परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेणारे सर्व शिक्षक - मार्गदर्शक यांचे अविरत प्रयत्नाने हे यश संपादन केल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. 

…......
छायाचित्रे : परेश कापसे
close