अखेर तो अविश्वास ठराव सहमत झालाच नाही..वडापुरी ग्रामपंचायत चे विद्यमान उपसरपंच यांच्याविरुद्ध केला होता ठराव..
इंदापूर प्रतिनिधी:ग्रामपंचायत वडापुरी चे विद्यमान उपसरपंच अश्विनी दत्तात्रय गायकवाड यांच्याविरुद्ध वडापुरी ग्रामपंचायतीच्या एकूण आठ सदस्यांनी दि.२३ जुलै २०२१ तहसीलदार इंदापूर यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. सदर ठरावाबाबत तहसीलदार इंदापूर यांनी नोटीस काढून ३० जुलै २०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालय वडापुरी येथे तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.०० वाजता सभा आयोजित केली होती. सदर सभेस ग्रामपंचायतचे संगीता श्रीमंत तरंगे सरपंच, अश्विनी दत्तात्रय गायकवाड उपसरपंच, शोभा प्रताप बागल, अंबिका शत्रुघन बागल, संगीता मारुती पासगे, रेखा प्रकाश करगळ, वैशाली संजय खामगळ, पांडुरंग शंकर पिंगळे हे सदस्य उपस्थित होते.
सदर सभेस एकूण बारा सदस्यांपैकी आठ सदस्य उपस्थित होते. सर्व सदस्यांना नोटीस देऊन पोच घेतली होती. उपस्थित सदस्यांचे अध्यक्ष यांनी स्वागत करून सभेच्या कामकाजास सुरुवात केली असता यामध्ये ग्रामपंचायत वडापुरी चे आठ सदस्यांनी २३ जुलै २०२१ रोजी उपसरपंच अश्विनी दत्तात्रय गायकवाड यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. त्याविरुद्ध अश्विनी दत्तात्रय गायकवाड उपसरपंच यांनी त्यांच्यावरील मांडण्यात आलेल्या मुद्दे फेटाळले. सदर ठराव बाबत सर्व उपस्थित सदस्यांनी हात उंच करून मतदान घेण्याबाबत सहमती दिली. त्यावेळी गुप्त मतदान बाबत किंवा लेखी अथवा तोंडी मतदानाबाबत कोणीही मागणी केली नाही. त्यामुळे सर्वप्रथम अविश्वास ठरावाच्या बाजूने ज्या सदस्यांना मतदान करायचे आहे. त्या सदस्यांनी हात उंच करून मतदान करण्याबाबत अध्यक्ष यांनी सांगितले त्यानुसार अविश्वासाच्या ठरावाचा बाजूने हात उंच करून मतदान केले. यामध्ये चार मते मध्ये अविश्वासाच्या ठरावाचा बाजूनी झाली. तर अविश्वास ठरावाच्या विरुद्ध बाजूने हात उंच करून मतदान करण्यात आले यामध्ये चार सदस्यांनी मतदान केले.
ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत वडापूरी येथील उपसरपंच अविश्वास ठरावाच्या बाजूने ३/४ म्हणजेच ९ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणे अपेक्षित होते तथापि सदर अविश्वास ठरावाच्या बाजूने चार सदस्यांनी मतदान केले असल्याने त्यामुळे उपसरपंच अविश्वासाच्या ठरावाच्या बाजूने अपेक्षित मतदान न झाल्याने सदरचा अविश्वास ठराव सहमत झालेला नाही असे यावेळी अध्यक्ष तहसीलदार ठोंबरे यांनी जाहीर केले
यावेळी वडापुरीचे सर्कल कदम, तहसील ऑफिस चे दीपक पवार, , दामोदर राठोड, वडापुरी तलाठी व्ही.के. कारंडे मॅडम,ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण राऊत. इत्यादी उपस्थित होते.

