प्रतिनिधी : संजय वायकर
अ .नगर : (दि .३१) : नगर शहरातील पाईपलाईन रोड भागातील महेंद्र नांदूरकर यांनी त्यांच्या घराच्या टेरेसवर भाजीपाल्याचा मळा तयार केला आहे.
यामध्ये प्रामुख्याने वांगी, भेंडी, गवार ,पावटा , पुदीना , मोहरी, अशा प्रकारचा भाजीपाला तयार करण्यात आला आहे .
घरावरच बनविलेल्या टेरेसवरील भाजीपाला मळ्यामुळे शेतीचा आनंद घेता येतो. यात प्रामुख्याने दुर्मिळ असणाऱ्या कोयरीच्या शेंगाचा वेल आहे असे नांदुरकर यांनी सांगितले .
वडिल अशोक आणि आई मोहिनी यांना शेतीची आवड असल्याने ते या छोट्याशा मळ्याची देखभाल करतात .
या टेरेस वरील भाजी पाल्याची निगा राखण्यासाठी त्यांची पत्नी सौ . दिपाली , मुलगी ईश्वरी आणि मुलगा साईराज यांचे विशेष सहकार्य मिळते .

