shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

थोरातांचे महसूलखाते नानाभाऊ कडे सोपवा..!!

नाना पटोले म्हणजे दुसरे नाना पाटेकर.... शिवराम पाटील..!!

प्रतिनिधी : संजय वायकर

जळगाव : (दि .१३) :    भाजपने केंद्रात थकलेले ,गंजलेले मंत्र्यांना काढून नव्या दमाचे मंत्री घेतले. चुकले हेच कि,त्यात गुन्हेगार जास्त आहेत.ते टाळता आले असते.चांगले खासदार असतीलच भाजपमधे.सापडले नसतील.

महाराष्ट्रात नाना पटोले तेज  तडफदार प्रदेश अध्यक्ष नियुक्त झाले. नाना पटोले म्हणजे दुसरे नाना पाटेकर. अंग्री यंग मैन !गुस्सा बहोत.विधानसभा अध्यक्षपद सोडून पक्षाची धुरा खांद्यावर घेतली. कांग्रेस च्या लोकांना बरे वाटले.त्यांनी अनेक जिल्ह्यात भेट दिली.लोकांनी चांगले स्वागत केले.त्यात आम्ही माहिर आहोतच.तिन पिढ्यांचा अनुभव आहे. या आदरसत्काराला हुरळून जाऊन, नानाभाऊ म्हणाले, मी मुख्यमंत्री होईन.ठाकरेंनी मनावर घेतले.इकडे कोरोना सुधरू देत नाही आणि हे मुख्यमंत्री ची स्वप्ने पाहातात. लोक जोड्याने मारतील.ही ठाकरेंची ठाकरी भाषा नेहमीचीच.अजितदादा मात्र मिश्कील पणे म्हणाले, मैजिक फिगर आणा आणि खुशाल व्हा मुख्यमंत्री. आमची काहीच हरकत नाही.

शिवराम पाटील


ठाकरेंनी जास्त मनावर घेतलेले दिसते.आम्ही मुंबईचे.विधानसभा मुंबईत. मंत्रालय मुंबईत. हे कोण नवीन माणूस ,विदर्भातून येथे येऊन मुख्यमंत्री बनायला निघाले?मुंबई तर आमची आहे.महाराष्ट्राची नाही. मराठी माणसांच्या नाही. फक्त शिवसेनेची.

ठाकरेंनी  याची खंत सोनिया गांधीकडे व्यक्त केली.त्यांनी नानाभाऊंना दिल्लीत बोलवून घेतले.म्हणे,असे नका बोलू.शिवसेना केंव्हाही भाजप ला समर्थन देऊ शकते.महत्प्रयासाने ते आपल्या सोबत आहेत.शिवसेना व राष्ट्रवादी ला पर्याय आहेत.ते कोणत्याही टिममधे सामील होऊ शकतात.भाजपमधे सुद्धा.आपल्याला भाजपची अलर्जी आहे.आपण एकटे पडलेलो आहोत.

    नानाभाऊ दिल्लीहून आले.हिरमुसले.दुखी झाले. हे जर काही च बोलू देत नसतील तर तोंडाला कुलुप लावून  राहाणार का?च्या आयला!नको ते अध्यक्षपद.त्यापेक्षा एखाद्या मलाईदार खात्याचा मंत्री बनलेले काय वाईट?किमान प्रवासाचा खर्च तर निघेल.पैसा मिळेल तर दौरा करता येईल.घरून खर्च करायला परवडत नाही. बाकीचे मंत्री पोते भरून गोडाऊन भरत आहेत.आणि आपण कार्यकर्त्यांच्या गाडीने प्रवास करतो.

महाराष्ट्रात कांग्रेस चे महसूलमंत्री थोरात सर्वाधिक अकार्यक्षम आहेत.खाते महत्त्वाचे आणि माणूस जेमतेम.उपयोग काय?ते महसूल चे काहीही काम करीत नाहीत.त्यांची क्षमता नाही. म्हणून त्यांच्याकडून महसूल खाते काढून त्यांना एका जागी आरामाचे पद दिले पाहिजे. जसे विधानसभा अध्यक्ष. सालमे छ दिन काम.बाकी छुट्टी.

थोरात यांचेकडून महसूल खाते काढून नाना पटोलेंना सोपवले पाहिजे. किमान नानाभाऊ प्रत्येक जिल्ह्यात जातील.समस्या ऐकून घेतील.तेथेच सोडवतील.त्यामुळे लोक कांग्रेस कडे आकर्षित होतील.तरच काहीतरी फरक पडेल.

कांग्रेस मधील एकही मंत्री अद्याप जनतेसमोर आला नाही. कदाचित हे शेवटचे मंत्रीपद आहे,असे थोरात आणि चव्हाण यांनी मनात ठरवलेले दिसते.पुन्हा.कांग्रेस चे  सरकार बनवण्याची शक्यता किमान वीस वर्षे नाही. नंतर बनले तर आपण राहाणार नाही.असा निरुत्साही विचार केलेला दिसतो.सद्या तरी कांग्रेस कडून  फक्त शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या कामकाज करताना दिसतात.बाकी सारे ढिम्म!काहींना धड चालता येत नाही. काहींना धड बोलता येत नाही. असे मुके बहिरे सोबत घेऊन कांग्रेस कशी सत्तेवर येणार?नानाभाऊंचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न स्वप्नच राहून जाणार.

महाआघाडी च्या माध्यमातून कांग्रेस ला सत्तेत सहभाग मिळाला.पंक्तीत बसले म्हणून वाढून दिले.दहा बारा मंत्रीपदे भाऊबंदकीच्या वाटणीतून मिळाली. मिळाली तर त्याचा उपयोग कांग्रेस ने करून घेतला पाहिजे.अकार्यक्षम  मंत्री बदलले पाहिजे.कार्यक्षम मंत्री बनवले पाहिजे. तरच भाजप समोर टिकाव लागू शकतो. तरच सेना व राष्ट्रवादी सोबत घेऊ शकतात.सद्या तरी कांग्रेस ची स्थिती महाराष्ट्रात दयनीय आहे.


"काठी नी घोंगड घेऊ द्या कि रं!

मलाबी जत्रेला येऊ द्या कि रं!!

या गीतातील तंतोतंत अवस्था आहे.नानाभाऊंची मेहनत वाया जायला नको.

    

आम्ही कांग्रेस बाबत असे का लिहीतो?त्याला संयुक्तिक कारण आहे.इकडे भाजप चे सरकार विरोधकांना न जुमानता कायदे बदलत आहेत, कायदे बनवत आहेत.विरोधी पक्ष मुकदर्शक बनलेला आहे.कमजोर बनलेला आहे.कांग्रेस मजबूत होत नाही तोपर्यंत भाजप ला शिव्याश्राप देऊन ही उपयोग होणार नाही. लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत आणि  जागृत असलाच पाहिजे. पण दुर्भाग्य! 

"वो खिलौना ~~

हम चल नही सकते,

और तुम दौड जाते हो!"


...शिवराम पाटील.

9270963122

जळगाव जिल्हा जागृत जनमंच.

close