अप्पर विभागीय आयुक्तांचे आदेश..!!
================
बीड । प्रकाश मुंडे जिल्हा प्रतिनिधी:-
अंबेजोगाई तालुक्यातील मौजे मगरवाडी-दस्तगीरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ.ज्योती मारूती माने यांच्या विरूध्द १४ व्या वित्त आयोगातील निधीतील अपहार व कामकाजातील अनियमीततेचा आरोप सिध्द झाल्यामूळे अप्पर विभागीय आयुक्त,औरंगाबाद यांनी याबाबत सरपंच यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले असल्याचे आणि या व्यवहारास जबाबदार धरून तत्कालीन ग्रामसेवक श्री.भोरे यांना निलंबीत करून त्यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत आहेत असे आदेश अप्पर विभागीय आयुक्त यांनी पारीत केले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की,मौजे मगरवाडी दस्तगीरवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत आहे.
सन २०१७ मध्ये सरपंच पदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत या दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी सौ.ज्योती मारूती माने यांना सरपंच पदी निवडून दिले.ग्रामपंचायतीच्या पहिल्याच मासीक सभेपासून कामकाजात अनियमीतता होत असल्याबाबत ग्रामपंचायतीचे सदस्य शिवाजी दगडू भोसले,ज्योती विनायक माने,बालासाहब मुगे या सदस्यांनी तक्रार करण्यास सुरूवात केली.परंतु,ग्रामसेवक व सरपंच यांनी या सदस्यांच्या तक्रारीकडे लक्ष न देता न झालेल्या सभांचे इतिवृत्त लिहीणे व ते कायम करणे,ग्रामपंचायतची मंजुरी न घेता ग्रामपंचायतसाठी मनभावात साहित्याची खरेदी करणे,न झालेल्या कामाचे देयक मंजूर करणे,१४ व्या वित्त आयोगाचा प्राप्त निधी ग्रामपंचायतची मंजूरी न घेता मनमर्जीने खर्च करणे,अशा प्रकारच्या अनियमितता सुरूच ठेवल्या,सरपंच व ग्रामसेवक तक्रारीची दखल घेत नाहीत असे लक्षात आल्यानंतर या गैरव्यवहाराचा तक्रार अर्ज गटविकास अधिकारी,मुख्यकार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयास केला.त्याची खुन्नस ठेवून ग्रामसेवकाने तक्रारदार सदस्यांवर शासकीय कामात आडथळा आणला असा बनाव करून कलम ३५३ खाली फौजदारी खटला दाखल केला.या कार्यवाहीस सरपंचाने सहाय्य केले.
सरपंच व ग्रामसेवकाच्या या दडपशाहीस न जुमानता तक्रारदार सदस्यांनी ग्रा.पं.मधील अनियमीतता व्यवहाराची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी अशी मागणी लावून धरली.त्या तक्रारीमध्ये सरपंच व ग्रामसेवकाविरूध्द पुढील आरोप करण्यात आले होते.
१) १४ व्या वित्त आयोगातून जि.प.शाळेसाठी दोन्ही गावासाठी अंबाजोगाई येथील दुकानात जेमतेम हजार रुपयाला येणारा एलईडी टी.व्ही. सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रा.पं.मासीक समेत मंजूरी न घेता.बीड येथून २५ हजार रूपये प्रमाणे खरेदी केले.या व्यवहारात ग्रामपंचायतला जवळजवळ २० हजारांचे नुकसान झाले.शासकीय नियमाप्रमाणे ही खरेदी केली नाही.,
२) १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतसाठी रू.२३,१७५ एक पथदिवा या प्रमाणे ३ पथदिवे खरेदी केले.बाजारात या पथदिव्यांची खरी किंमत १२ हजार रूपये आहे.
या व्यवहारात सुध्दा ग्रा.पं.मासीक सभेत मंजूरी घेतली नाही.ग्रामपंचायतचे जवळजवळ ३३ हजारांचे नुकसान झाले.खरेदी करताना कोणतेही नियम पाळले नाहीत.,
३) १४ व्या वित्त आयोगातून अंगणवाडीसाठी ३० हजार रूपयांचे बीड येथून खेळणी कीट खरेदी केले.या साहित्याची अंबाजोगाईच्या बाजारात जेमतेम १० हजार रूपये किंमत होती.या व्यवहारात सुद्धा ग्रामपंचायतला २० हजारांचे नुकसान झाले.खरेदीसाठी नियम पाळले नाहीत.,
४) १४ व्या वित्त आयोगातून जि.प.शाळेतील मुलांसाठी ड्रेस खरेदी केले.या खरेदीसाठीही नियमांचे पालन केले नाही.,
५) १४ व्या वित्त आयोगातून महीलांना शिलाई मशिन प्रशिक्षण देण्यात आले.यासाठी ४० हजार रूपये ग्रामपंचायतचे खर्च करण्यात आले.हा व्यवहार देखील पारदर्शीपणे केला नाही.गावातील महीलांसाठी १० हजार रूपयांचे सॅनिटरी नॅपकिन खरेदी केली असे दाखवले परंतू, गावातील एकाही महीलेस त्याचे वाटप केले नाही.खरेदी न करता फक्त ग्रामपंचायतच्या हिशोबात खर्चाची पावती लावली व ग्रामपंचायत नुकसान केले.,
६) १४ व्या वित्त आयोगातून जि.प.शाळा ते मंदीराजवळील विहीर किंवा आडापर्यंत नविन पाईपलाईन केल्याचे दाखवून ६१ हजार रूपये उचलले. खरी परिस्थीती ही होती की,जुन्याच पाईपलाईनची दुरूस्ती केली होती.
दुरूस्तीसाठी जास्तीत-जास्त ५-१० हजार खर्च आला असेल.या एकाच व्यवहारात ५० हजार रूपये ग्रामपंचायतचे नुकसान केले.,
७) ग्रामपंचायत निधी मधुन ग्रामपंचायतीसाठी खुर्च्या खरेदी करताना नियमांचे पालन केले नाही.,
८) ग्रामस्थांकडून पंतप्रधान आवास योजनेचे जियो टॅगींग करण्यासाठी अनेक ग्रामस्थांकडून प्रत्येकी २५० रूपये वसूल केले.ते ग्रामपंचायत खात्यावर जमा न करता परस्पर खर्च केले.तक्रारदार सदस्यांनी केलेले हे सर्व आरोप गटविकास अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चौकशीमध्ये खरे आढळून आले.त्यामूळे तक्रारदार सदस्यांचा अर्ज स्विकारून तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांचा दि.२१/१/२०२१ चा प्रस्ताव मान्य करून मा.अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी मगरवाडी-दस्तगीरवाडीच्या सरपंच सौ.ज्योती मारूती माने यांना सरपंच आहे.पदावरून दिनांक २/७/२०२१ रोजी पासून बडतर्फ केले.या व्यवहारासाठी जबाबदार असलेले तत्कालीन ग्रामसेवक श्री.भोरे यांना निलंबित करून त्यांच्या विरूद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही चालू करण्यात आल्याची माहिती तक्रारदार यांनी आमच्याशी बोलताना दिली आहे.तक्रारदार सदस्यांनी व ग्रामस्थांनी या निर्णयाची माहिती देताना ग्रामपंचायती मध्ये वरील आरोपांव्यतिरिक्त सबमर्सिबल पंप खरेदी,बोअरवेल ते पाणी पुरवठा विहीर पाईपलाईन या कामात साहित्य खरेदीत अनियमीतता झाली आहे,तसेच ग्रामस्थांकडून पाणी पुरवठा योजनेसाठी प्रत्येकी ५०० रूपये प्रमाणे ५१ हजार रूपये जमा करून बोअरवेल घेतले,तेच बोअरवेल ग्रामपंचायतने घेतले असे दाखवून ५१ हजार रूपये हाडप केले आहेत असे अनेक गैरव्यवहार झालेले आहेत.हे सर्व व्यवहार मिळून ८ ते ९ लाख रूपयांचा अपहार झालेला आहे असे सांगितले.
त्यामुळे ग्रामपंचायतचे तात्काळ स्पेशल ऑडीट करून ग्रामपंचायतचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी या सर्व भ्रष्ट व्यवहारासाठी जिम्मेदार असलेल्या सरपंच,ग्रामसेवक यांना व न घेतलेल्या सभा घेतल्या असे दाखवून खोटे इतिवृत्त कागदपत्र तयार करण्यासाठी साह्य करणा-या सदस्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करून कार्यवाही करावी.तसेच ग्रामपंचायतचे झालेल्या नुकसानीचा आढावा घेवून सदरील रक्कम सरपंच,ग्रामसेवक व या व्यवहारास साह्य करणा-या सदस्यांकडून वसूल करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.चीड केली आहे.
ग्रामपंचायत निधी अपहार करणारांकडून वसूल करा
=============
मगरवाडी-दस्तगीरवाडी ग्रामपंचायत निधी हडप करून अपहार करणारांकडून सदरील निधी वसूल करा,संबंधितांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत.
- विनायक माने ()
शासकीय निधीचा अपहार व कामकाजात अनियमितता
=============
मगरवाडी-दस्तगीरवाडी ग्रामपंचायतच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.त्यामुळे मगरवाडी-दस्तगीरवाडीच्या सरपंच यांना बडतर्फ तर तक्रारदारावर दबाव आणल्याने ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात येत आहे.
-बाबासाहेब बेलदार (अप्पर विभागीय आयुक्त,औरंगाबाद.)
================


